पत्नी सरपंच, पती उपसरपंच ! ही ग्रामपंचायत एकाच घरात - Wife Sarpanch, Husband Deputy Sarpanch are Gram Panchayat in the same house | Politics Marathi News - Sarkarnama

पत्नी सरपंच, पती उपसरपंच ! ही ग्रामपंचायत एकाच घरात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतच्या निवडनुका नुकत्याच पार पडल्या होत्या . त्यापैकी आज 52 ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदच्या निवडणुका झाल्या. त्यात अनेक ठिकाणी बिनविरोध, तर काही ठिकाणी निवडणूका झाल्या.

पारनेर : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतच्या निवडनुका नुकत्याच पार पडल्या होत्या . त्यापैकी आज 52 ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदच्या निवडणुका झाल्या. त्यात अनेक ठिकाणी बिनविरोध, तर काही ठिकाणी निवडणूका झाल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच वाळवणे ग्रामपंचायतमध्ये एकाच वेळी पति-पत्नीची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली व त्यानंतर आज पुन्हा पत्नी जयश्री पठारे सरपंच, तर पती सचिन पठारे उपसरपंच झाले आहेत. तालुक्यात प्रथमच असे घडले आहे.

हंगे ग्रामपंचायतच्या सरपचपदी बाळू वसंत दळवी व उपसरपंच वनिता गोरक्षनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. 15 सदस्य असलेल्या निघोज ग्रामपंचायतीत दोन सदस्य गैरहजर राहिले, तर विजयी उमेदवारांना नऊ, तर विरोधकांना सहामते मिळाली. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

 

हेही वाचा..

कानडेंच्या वक्तव्यातून कॉंग्रेस संस्कृतीचे दर्शन 

शिर्डी : अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशव्यापी निधी संकलन सुरू आहे. संत-महंतापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातील विविध घटकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या निधीसंकलन अभियानावर टीका करून आमदार लहू कानडे यांनी कॉंग्रेस संस्कृतीचे दर्शन घडविले, अशी टीका भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आज केली. 

ते म्हणाले, की मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेसची घालमेल सुरू आहे. हिंदुत्वावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कानडे यांनी केलेली टीका हा त्याचाच भाग आहे. निधीसंकलन करताना देणगी देणाऱ्यांना लगेच पावती दिली जाते. नगर जिल्ह्यातील सर्व संत-महंत, कीर्तनकारांचा या अभियानात सक्रीय सहभाग आहे. कॉंग्रेस सुरवातीपासून या राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यास विरोध करीत आहे. टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. 

शेतकरी, शेतमजूर ते उद्योजकांपर्यंत समाजातील सर्व घटक प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माणकार्यात उत्साहाने सहभागी होत आहेत. एका अर्थाने नगर जिल्हा श्रीराममय झाला आहे. दुसरीकडे या अभियानावर टीका करून कॉंग्रेसचे आमदार पक्षाची जुनी परंपरा पुढे चालवीत असल्याची टीका गोंदकर यांनी केली. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख