उशिराने का होईना, पंतप्रधानांनी लसीकरणाची जबाबदारी घेतली : थोरातांचा टोला

आजवर देशात झालेल्या सर्व लसीकरण मोहिमांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती; मात्र मोदी सरकारने ती राज्यांवर ढकलून पळ काढला होता.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : ‘‘उशिराने का होईना, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे होणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी लसीकरणाची जबाबदारी घेतली,’’ असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. (Why not late, PM takes responsibility for vaccination: Thorat's Tola)

थोरात म्हणाले, ‘‘आजवर देशात झालेल्या सर्व लसीकरण मोहिमांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती; मात्र मोदी सरकारने ती राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका होऊ लागली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर आता केंद्र सरकारने नाइलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता जबाबदारी घेतलीच आहे, तर ती नीट पार पाडावी, हीच अपेक्षा आहे.’’

‘‘अपयश हुशारी लपवण्यासाठी मोदींनी, ‘राज्यांची विनंती आहे, राज्य सरकारे आता असमर्थ ठरत आहेत, पुनर्विचाराची मागणी करीत आहेत,’ असे म्हणत सोयीस्करपणे त्याला बगल दिली. राज्य सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेऊन एकरकमी पैसे देऊन राज्यातील जनतेला लस देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच लसीकरण मोहिमेला गती येत नव्हती. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आले आहे,’’ असे थोरात म्हणाले.
 

हेही वाचा..

ही घुलेवाडी हाय... हितं थुकलेलं चालत नाय

संगमनेर : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असूनही, वाट्टेल तिथे बेदरकारपणे थुंकणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल व ग्रामस्थांनी थुंकणेविरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून, या वाईट सवयीवर बोलण्याचे धाडस घुलेवाडीकरांनी दाखविले आहे.

सार्वजनिक ठिकाणी खोकणे, शिंकणे, थुंकणे हीही कोरोना संसर्गवाढीची कारणे आहेत. सार्वजनिक रस्ता, कार्यालयांचे कोपरे, बसस्थानक किंवा सार्वजनिक वापराच्या कोणत्याही ठिकाणी इतरांची तमा न बाळगता तंबाखूजन्य पदार्थ किंवा गुटखा सेवन करून थुंकणाऱ्या महाभागांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. यावर वादावादी करण्यापेक्षा अशा महाभागांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून देताना, त्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी घुलेवाडीतील तरुणाई सरसावली आहे.

गावातील युवकांनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला या अभियानाची माहिती देणारे फलक घेऊन प्रबोधन केले. या अभियानातून कोरोनाची साखळी तुटावी, हा उद्देश आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, सोपान राऊत, शंकर ढमाले, दिलीप पराड, ग्रामसुरक्षा दल व युवाशक्ती संघटनेचे सर्व कार्यकर्ते, जी. व्ही. रूपवते मेमोरिअल ट्रस्ट व घुलेवाडी फाट्यावरील रिक्षाचालक, ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com