शनिदेव कोणाला पावणार ! देवस्थानच्या अध्यक्षपदाबाबत उत्सुकता - Who will get Shanidev! Curiosity about the presidency of the temple | Politics Marathi News - Sarkarnama

शनिदेव कोणाला पावणार ! देवस्थानच्या अध्यक्षपदाबाबत उत्सुकता

विनायक दरंदले
सोमवार, 4 जानेवारी 2021

नवीन विश्वस्त मंडळात दरंदले आडनावाचे तीन,बानकर - २, शेटे - २, तर कुऱ्हाट, भुतकर, बोरुडे व आढाव या आडनावाचा प्रत्येकी एक विश्वस्त आहे.

सोनई : शनिशिंगणापुरच्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड या आठवड्यात होत असून, अध्यक्ष कोण होणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. अध्यक्ष पदासाठी प्रा. शिवाजी दरंदले, अप्पासाहेब शेटे व भागवत बानकर यांच्या नावाची चर्चा असून, कुणाला ही संधी मिळणार याची चर्चा झडत आहे.

तत्कालीन फडणवीस सरकाने येथील विश्वस्त मंडळ बरखास्त करीत देवस्थान शासन नियंत्रणात घेतले होते. हा निर्णय सध्याच्या आघाडी सरकारने बाजुला ठेवून पुर्वीच्या घटनेप्रमाणे नवीन विश्वस्त मंडळ नेमले आहे. नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी मागील महिन्यात गावातीलच अकरा जणांची विश्वस्त म्हणून निवड जाहीर केली आहे.

नवीन विश्वस्त मंडळात दरंदले आडनावाचे तीन,बानकर - २, शेटे - २, तर कुऱ्हाट, भुतकर, बोरुडे व आढाव या आडनावाचा प्रत्येकी एक विश्वस्त आहे.

या सर्वसमावेशक मंडळाबद्दल प्रथमच गाव व परिसरात कौतुक होत आहे. अध्यक्ष पदासाठी प्रा. शिवाजी दरंदले, अप्पासाहेब शेटे व भागवत बानकर यांच्या नावाची चर्चा असून, कुणाला ही संधी मिळणार याची चर्चा झडत आहे. याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचा कारभार प्रगतीपथावर असून, ट्रस्टने पंधरा वर्षात लोकहिताचे उपक्रम राबविले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे ट्रस्टवर गावातीलच व्यक्ती विश्वस्त राहिल्याने ग्रामस्थांत समाधान आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतील पानसनाला प्रकल्पाचे उदघाटन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 
 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख