पुलाचे श्रेय कोणाचे? स्लॅबचा प्रारंभ दोनदा, आमदार लहामटे यांच्याकडून पहाटे, तर पिचड यांच्याकडून सकाळी उद्घाटन

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनीपहाटे 5 वाजता केले, तर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनीसकाळी 10 वाजता केले. त्यामुळे या पुलाचे श्रेय कोणाचे, यावरून राजकारण सुरू झाले आहे.
lahamte and pichad.png
lahamte and pichad.png

अकोले : अनेक अडथळे पार करीत काल पिंपरकने येथील पुलाच्या स्लॅबचे काम सुरू झाले. परंतु त्याचे उद्घाटन दोनदा झाले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी पहाटे 5 वाजता केले, तर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी सकाळी 10 वाजता केले. त्यामुळे या पुलाचे श्रेय कोणाचे, यावरून राजकारण सुरू झाले आहे.

दोन डोंगरांना जोडणारा हा पूल राज्यातील नदीवर बांधण्यात येणार सर्वात मोठा पूल असून, या पुलाची निर्मिती व्हावी म्हणून निळवंडे धरणाच्या पायाभरणी वेळेस `आधी पुनर्वसन मगच धरण` ही अट प्रकल्प ग्रस्तांनी टाकत हे काम बंद पाडले होते, मात्र तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प ग्रस्तनची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविले. त्यावेळी प्रकल्पग्रस्त मधुकर पिचड यांनी अगोदर आमच्या नदीवर उड्डाणपूल करा व मगच काम सुरू करा, त्याप्रमाणे 36 कोटींचा हा अर्धकिलो मीटर लांबीचा पूल मंजूर करण्यात आला होता. योगायोग म्हणजे आज त्या पुलाचा पहिला स्लॅब सुरू होताना प्रकल्पग्रस्तांना न विसरता माजी आमदार वैभव पिचड यांनी बोलावून श्रीफळ वाढविले, तर आजी आमदारांनी पहाटे येऊन श्रीफळ वाढविले 

या कामावर जलसंपदाचे सुनील वाकचौरे यांनी कामाचे योग्य मूल्यमापन करून नियोजन केले, काल सकाळी माजी आमदार वैभव पिचड प्रकल्पग्रस्त यांनी पुलाच्या कामास भेट दिली व श्रीफळ वाढविले. प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो, अशी घोषणा देत पुलाच्या कामाचे स्वागत केले, या वेळी राजूरच्या व्यापारी, सरपंच गणपत देशमुख, भास्कर एलमामे, देविदास शेलार, प्रकल्पग्रस्त मधुकर पिचड, गोरक्ष परते, काळू मोहंडुळे, उपस्थित होते.

गिरीश महाजन यांच्याकडून निधी आणला : पिचड

अकोले तालुक्यात यापूर्वी विरोधी पक्षातील आमदार असल्याने कामे होत नव्हती. विकास निधी न मिळाल्याने तालुक्यातील सर्व विकास कामे ठप्प होती. पिंपरकणे पूल आवश्यकच होता म्हणून त्या वेळी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जाऊन या पुलासाठी निधी आणला होता. त्यामुळेच भाजपमध्ये गेलो. परंतु याचे श्रेय आता इतर लोकप्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पहाटे अंधारात येवून कुणी नारळ वाढवून श्रेय घेत असतील, तर हे हस्स्यास्पद आहे, अशी टीका माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

मी पाठपुरावा केल्यामुळे निधी : आमदार डाॅ. लहामटे

पिंपरकने पुलाचे काम निधी अभावी गेले अनेक दिवस बंद होते. या सहा महिन्यांत मी विधामंडळात हा प्रश्न प्राधान्याने मांडला व त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे निधी उपलब्ध झाला. हे काम 2022 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे. काल पहाटे पाच वाजता या पुलाच्या स्लॅबच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ केला केला आहे. तसेच तालुक्यातील अन्य कामांनाही गदी देण्यात येईल. निळवंडेच्या कॅनाॅलबाबत लवकरच निर्णय होणार असून, तेही कामे पूर्ण होणार आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com