Who is behind the scenes in Wadhwan case: Vikhe Patil | Sarkarnama

वाधवान यांचा पडद्यामागचा "बागवान' शोधा : विखे पाटील

डाॅ. बाळ ज. बोठे पाटील
बुधवार, 29 एप्रिल 2020

वाधवानप्रकरणी आता चौकशीचा फार्स करून फक्त अधिकाऱ्यांना बळी दिले जाईल. मात्र, ही परवानगी राजकीय वरदहस्ताशिवाय देणेच शक्‍य नाही. वाधवान बंधूंना परवानगी दिल्याच्या प्रकरणामागील पडद्यामागचा "बागवान' मात्र वेगळाच आहे.

नगर : ``कोरोनाच्या लढ्यात सामान्य जनता व प्रशासन होरपळून निघत असताना सरकार मात्र वाधवान बंधूंसारख्या मंडळींना "हवापालट' करण्याकरिता प्रवासाला खास परवानगी देत आहे.  वाधवान यांचा पडद्यामागचा "बागवान' शोधावा,`` अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

विखे पाटील म्हणाले, `` वाधवानप्रकरणी आता चौकशीचा फार्स करून फक्त अधिकाऱ्यांना बळी दिले जाईल. मात्र, ही परवानगी राजकीय वरदहस्ताशिवाय देणेच शक्‍य नाही. वाधवान बंधूंना परवानगी दिल्याच्या प्रकरणामागील पडद्यामागचा "बागवान' मात्र वेगळाच आहे. तो राज्य सरकार पुढे आणू शकत नव्हते. आता "सीबीआय'च्या चौकशीत तरी पुढे यावा.``

लॉकडाउनची आपत्ती केली इष्टापत्तीत परावर्तित!
सहकार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील मोठा पसारा विखे पाटील यांच्या लोणी, प्रवरानगर व नगर येथील कॅम्पसमध्ये आहे. मंत्रिपद व त्यानंतरच्या काळात या संस्थांमधील कामकाजास आपल्याला वेळच मिळत नव्हता. लॉकडाउनच्या काळात विखे पाटील यांनी विविध संस्थांच्या दैनंदिन कामात विशेष लक्ष घातले. याशिवाय आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी समक्ष अथवा मोबाईलवर संवाद साधला. गरजूंना मदतीचा हात दिला. लॉकडाउनच्या काळात विविध मार्गांनी आपत्ती आली; परंतु कार्यकर्त्यांशी संपर्क व विविध संस्थांमधील कामकाजात बारकाईने लक्ष घालत, त्या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करण्याचे काम आपण केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. 

प्लाझ्माच्या वापराचा वैश्विक लाभ होईल
विखे पाटील म्हणाले, ``कोरोनावर मात करण्यासाठी लसीचा शोध लावण्याच्या कामात शास्त्रज्ञ गुंतले आहेत. आपल्याकडे "प्लाझ्मा'चा वापर करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यालाही यश येऊन, त्याचा वैश्‍विक लाभ होईल.``
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख