kardile and jagtap 1.jpg
kardile and jagtap 1.jpg

भाजपचे पत्ते केव्हा उलगडणार, कर्डिले राष्ट्रवादीतील जावयाला मदत करणार का?

या निवडणुकीत कर्डिले कोणाला मदत करणार, शिवसेनेला की भाजपला हे काळच ठरविणार आहे. पण इतक्यात पत्ते ओपण करतील, ते कर्डिले कसले, हेही नगरकर ओळखून आहेत.

नगर : महापौर निवडणुकीत भाजपकडे आरक्षणानुसार उमेदवारच नसल्याने जास्त धडपड करण्याचे कारण नाही, मात्र शिवसेना व राष्ट्रवादीचे सूत जुळले नाही, तर भाजपला सत्तेत राहण्यास संधी आहे. त्यामुळे भाजपचे माजीमंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) पक्षाला सत्तेत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला म्हणजेच जावई असलेले आमदार संग्राम जगताप यांना मदत करणार, की वेगळी भूमिका घेणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. (When will the addresses of BJP be revealed, will Kardile help Javaya in NCP?)

महापालिकेत सध्या भाजपचे महापौर आहेत. मागील निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसने म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नामुळे भाजपला सत्ता मिळू शकली. या राजकीय घडामोडीत शिवसेनेला मात्र जास्त जागा असूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. आता राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व कॉग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळला, तर राष्ट्रवादी व शिवसेनेला एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागेल. अशा परिस्थितीत भाजपला मात्र विरोधी बाकावर बसावे लागेल. आघाडीचा धर्म न पाळला शिवसेना व राष्ट्रवादीचे सूत जुळले नाही, तर भाजपच्या भूमिकाला महत्त्व राहणार आहे.

भाजपने आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. लगेचच ते करणारही नाहीत. सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला मदत करण्याचा प्रयत्न राहिल, असे सुतोवच कर्डिले यांनी केले आहे. त्यामुळे तटस्थ न राहता दुसऱ्या पक्षाला मदत करणार असल्याची भूमिका असल्याचे दिसून येते.

यापूर्वीच्या महापाैरपदाच्या सर्वच निवडणुकांमध्ये कर्डिले यांनी लक्ष घातलेले आहे. नगर शहराचे राजकारण आणि कर्डिले यांचे जवळचे नाते आहे. अनेकदा तर कर्डिले यांचीच भूमिका अंतीम ठरली आहे. विशेष म्हणजे नगर शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिले यांचे जावई आहेत. पुढील निवडणुकीतही जगताप यांना पुन्हा आमदार करण्यासाठी कर्डिले प्रयत्न करतील, हेही निश्चित मानले जाते. महापाैर राष्ट्रवादीचा राहिल्यास जगताप यांना पुढील निवडणूकही सोपी जाईल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे महापौरपद असण्यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न असतील.

या सर्व घडामोडीत भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कर्डिले कोणाला मदत करणार, शिवसेनेला की भाजपला हे काळच ठरविणार आहे. पण इतक्यात पत्ते ओपण करतील, ते कर्डिले कसले, हेही नगरकर ओळखून आहेत.

हेही वाचा...

हेही वाचा...

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com