विखे पाटील यांच्या नातवंडांजवळ पाच फुटावर बिबट्या येतो तेव्हा - When a leopard approaches Shalini Vikhe's grandchildren at five feet | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटील यांच्या नातवंडांजवळ पाच फुटावर बिबट्या येतो तेव्हा

सतीश वैजापूरकर
रविवार, 30 ऑगस्ट 2020

बिबट्या आणि या तिघांच्या मध्ये एक कुत्रे अचानक येऊन उभे राहिले. बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली. त्याला जबड्यात धरून तो क्षणार्धात उसाच्या शेतात दिसेनासा झाला.

शिर्डी : शेतावर एका निवांत वेळी नातवांना डबा खाऊ घालत असताना बिबट्या ऊसाच्या शेतात अवघ्या पाच फुटांवर आला. मध्ये असलेल्या एका कुत्र्यावर त्याने झडप घालून तोंडात पकडून घेऊन गेला. अंगावर शहारे आणणारी घटना शनिवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे पाटील यांच्यासमोर घडली.

काल दुपारी शेतावर त्या शेतावर होत्या. आपल्या दोन्ही नातवंडांना डबा खाऊ घालीत होत्या. शेजारी पाच फुटावरील उसाच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला आहे. हे त्यांच्या गावीही नव्हते. निरागस नातवंडे आनंदाने डबा खात होती. दैव बलवत्तर अचानक काय घडले माहीती नाही. बिबट्या आणि या तिघांच्या मध्ये एक कुत्रे अचानक येऊन उभे राहिले. बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली. त्याला जबड्यात धरून तो क्षणार्धात उसाच्या शेतात दिसेनासा झाला. कुत्रे आले नसते, तर काय झाले असते, असा प्रश्न क्षणार्धात शालिनी विखे पाटील यांना पडला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या तावडीतून सर्व वाचले. नातवंडांवर आलेले संकट कुत्र्यावर निभावले, असेच काहीसा प्रकार काल झाला.

दरम्यान, महाराष्ट्रात बिबट्याने हल्ले झालेले अनेक उदाहरणे आहेत. अकोले तालुक्यात तर अनेक बालकांवर बिबटे हल्ले करतात. ठिकठिकाणी पिंजरे लावून त्यांना सुरक्षित स्थळी पाठविणे आवश्यक असताना वन विभागाकडून मात्र फारशी दखल घेतली जात नाही. आता बिबटे शहराकडे धावत असल्याने मानवाला धोका निर्माण होत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख