शेतकऱ्याचा पावणेतीन लाखाचा धनादेश बॅंकेकडून गहाळ होतो तेव्हा...

मात्र दीड महिना उलटला, तरी पैसे जमा हाेत नसल्याने आहेरयांनी बॅंकेत चाैकशी केली. त्यावर बॅकेतून धनादेश गहाळ झाला आहे. ताे परत आणावा,असे बॅंकेतून सांगण्यात आले.
farmer
farmer

नगर : कांदाविक्री केल्यानंतर व्यापाऱ्याकडून पावणेतीन लाखांचा धनादेश शेतकऱ्याला मिळाला.पैशांची गरज असल्याने शेतकऱ्याने तो बॅंकेत जमा केला. तीन महिने हेलपाटे मारूनही पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्याने चौकशी केली. तो धनादेश बॅंकेकडून गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित व्यापाऱ्याने धनादेश पुन्हा द्यावा, असे पत्र बॅंकेने शेतकऱ्याला दिले; परंतु पैसे मिळण्यात दिरंगाई होत होती. शेतकऱ्याने ही कैफियत राहुरी बाजार समितीच्या सभापतींकडे मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले अन् शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

ज्ञानेश्वर आहेर (रा. नाराळा, ता. वैजापूर) येथील शेतकऱ्याने राहुरी बाजार समितीत कांद्याची विक्री केली. त्यापाेटी त्यांना आडत व्यापारी संजय काेळसे यांनी यांनी दाेन लाख 65 हजार चार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश आहेर यांनी बॅंकेत भरल्यांतर वटायला चार ते पाच दिवस लागतील, असे बॅंकेतून सांगण्यात आले. पैसे जमा झालेले नाहीत, अजूनही काही दिवस लागतील, असे बॅंकेकडून आहेर यांना सांगण्यात आले. मात्र दीड महिना उलटला, तरी पैसे जमा हाेत नसल्याने आहेर यांनी बॅंकेत चाैकशी केली. त्यावर बॅकेतून धनादेश गहाळ झाला आहे. ताे परत आणावा, असे  बॅंकेतून सांगण्यात आले. बॅंकेकडून निराेप मिळताच शेतकऱ्याने व्यापाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. 

काेळसे यांनी बॅँकेकडून धनादेश हरवला आहे, तसे पत्र घेऊन मला पाठवा, मी त्या बदल्यात दुसरा धनादेश देताे नाही, तर पैसे थेट खात्यावर जमा करताे, असे सांगितले. बॅंकेकडून पत्र घेण्याची प्रक्रिया सुरु असतानाच लाकडाउन जाहीर झाले. त्यामुळे सगळेच व्यवहार थांबले. बॅंकेकडून पत्र मिळाले, मात्र व्यापाऱ्यापर्यंत पाेहचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला. पैशांची गरज असल्यामुळे आहेर यांनी आपली व्यथा सभापती अरुण तनपुरे यांच्यासमाेर मांडली. त्यांनी तातडीने या संदर्भात काेळसे यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. यात बॅंकेची चूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने काेळसे यांनी बॅंकेत धनादेश वटला की नाही, याची खातरजमा झाल्यानंतर लगेच पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले. पैसे खात्यावर जमा हाेताच शेतकऱ्याच्या डाेळ्यात आनंदाश्रू तरवळले.

सभापतींमुळे पैसे मिळाले

राहुरी बाजार समितीत आम्ही नेहमीच कांदा विक्रीस आणतो. बॅंकेकडून धनादेश हरवल्यामुळे अडकलेले पैसे सभापती अरुण तनपुरे यांच्यामुळेच मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित शेतकरी ज्ञानेश्वर आहेर यांनी दिली.

बाजार समितीचा व्यवहार पारदर्शक

राहुरी बाजार समितीचा कारभार पारदर्शक असून, व्यापाऱ्यांचे व्यवहार चाेख आहेत. येथे काेणाची अडवणूक हाेत नाही. बॅंकेकडून झालेल्या धनादेश हरवल्यामुळे व त्यानंतर लाॅकडाउनमुळे शेतकऱ्याला पैसे मिळण्यास विलंब झाला, अशी प्रतिक्रिया राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com