मंत्री गडाखांच्या मतदारसंघात हे काय चालले ! शेतकऱ्याने पुन्हा पेटविला दीड एकर ऊस - What is going on in Mantri Gadakh's constituency! The farmer re-ignited one and a half acres of sugarcane | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाखांच्या मतदारसंघात हे काय चालले ! शेतकऱ्याने पुन्हा पेटविला दीड एकर ऊस

विनायक दरंदले
गुरुवार, 4 मार्च 2021

मुळा कारखाना करत असलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकार व मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करत उसाचे पीक पेटवून दिले. 

सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोड देत नसल्याने हनुमानवाडी येथील युवा शेतकऱ्याने शासन व संबंधित मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा गोड उसाच्या राजकारणातून कडवट कलगीतुरा रंगला आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याच मतदारसंघात होत असलेल्या या प्रकाराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. 

मुळा कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी गट नंबर ५६६ मधील दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले. महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी परीसरातील शेतकरी,पोलिस बंदोबस्त व बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

हेही वाचा... त्यांनी मलिदा घेतला अन...

मागील महिन्यात करजगाव येथे अशोक टेमक यांनी अडीच एकर ऊस पीक पेटवून दिले होते. त्यानंतर सोशलमिडीयावर स्टंटबाजीचा कलगीतुरा रंगला होता. दडपण आणून उसतोड करण्याचा हा प्रयत्न असून, शेतकी विभाग त्यास बळी पडला, तर आम्हीही ऊस पेटवून देवू, असे खरवंडी, चांदे व सोनई गटातील शेतकऱ्यांनी सांगितले.

मुळा कारखाना करत असलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकार व मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करत उसाचे पीक पेटवून दिले. साखर आयुक्तांपुढे कैफियत मांडून उपयोग झाला नाही. पुढील आंदोलन आत्मदहनाचे असणार आहे, असे ॠषीकेश शेटे यांनी सांगितले.

हेही वाचा... घुलेंच्या शर्य़तीत शेळकेंची एन्ट्री

काही राजकीय विरोधक फक्त बदनामी करण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत. नोंदी दिलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय नको म्हणून या दडपणाला घाबरणार नाही, असे 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख