tanpure.png
tanpure.png

या मंत्र्यांनी भर बाजारात काय बरं केली दिवाळीची खरेदी !

मंत्री तनपुरे कुठलाही बडेजाव न मिरवता शहरात फिरून, सामान्य नागरिकांमध्ये मिसळून जातात. त्यामुळेजनतेमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होत आहे.

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी शहरात पायी फिरताना रस्त्यावर, चहाच्या टपरीवर, एखाद्या दुकानात नागरिकांच्या गराड्यात जागेवर समस्या सोडवितांना दिसतात. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी सपत्नीक राहुरीच्या बाजारपेठेत खरेदीचा आनंद घेतला. खरेदी करताना विक्रेत्यांच्या सुख-दुःखाची त्यांनी वचारपूस केली.

मंत्री तनपुरे कुठलाही बडेजाव न मिरवता शहरात फिरून, सामान्य नागरिकांमध्ये मिसळून जातात. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होत आहे. विशेषत: बाहेरगावाहून समस्या घेऊन, भेटायला आलेल्या जनतेला लवाजमा नसलेले मंत्री भेटल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. मंत्री तनपुरे रस्त्याने चालताना त्यांच्याभोवती जनतेचा गराडा पडतो. राहुरीचे नगराध्यक्ष असताना त्यांची कार्यपद्धती जनतेला भावली. आमदार झाले, मंत्री झाले. तरी त्यांच्या वागण्यात व कार्यपद्धतीत तसूभरही बदल झाला नाही. सामान्य जनता व मंत्री यांच्यातील अंतर कमी झाले नाही, हीच भावना नागरिकांची आहे.

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंत्री तनपुरे व सोनाली तनपुरे या उभयतांनी शहरातील बाजारपेठेत फिरून, खरेदी केली. कापड दुकानातून कपडे, छोट्या व्यावसायिकांकडून पणत्या व दिवाळीचे साहित्य खरेदी केले. त्यांना भेटलेल्या व्यापारी व नागरिकांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या. छोट्या व्यवसायिकांना व व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी आस्थेने विचारपूस केली. कोरोना महामारी संपलेली नाही. मास्क, सॅनीटायझर याचा वापर करावा. असे प्रबोधन केले. मंत्री तनपुरे यांच्या वागण्यातील साधेपणा, आस्थेने व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, मंत्री रस्त्यावर फिरताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे सर्वसामान्य विक्रेत्यांकडून त्यांनी विविध वस्तू घेतल्या. व्यापाऱ्यांची, विक्रेत्यांची चाैकशी करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीचा आनंद तर घेतलाच, शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नाहीत. गर्दी करतातच, हेही त्यांनी पाहिले. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी  नियंत्रणासाठी आगामी काळात काही उपाययोजना करता येतील का, याबाबत ते निश्चित चर्चा करतील, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com