भाजपमध्ये काय शिजतेय ! राज्य सरकारबाबत शिवाजी कर्डिले यांचे मोठे भाकित

गणित एकच आहे, की महाविकास आघाडीतील पक्ष कितीही एकत्र आले असले, तरी त्यांच्या नेत्यांत एकमेकांमध्ये धुसफूस आहे. एकमेकांविषयीची नाराजी वाढत आहे.
shivaji-kardile.jpg
shivaji-kardile.jpg

नगर : महाविकास आघाडी सरकारबाबत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मोठे भाकित केले आहे. हे सरकार केवळ दोनच महिने टिकणार असून, नंतर भाजपची सत्ता येईल, असे कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमके काय शिजतेय, याबाबत राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना कर्डिले यांनी आपली भूमिका विषद केली. ते म्हणाले, की आगामी काळात गणिते बदलणार आहेत. गणित एकच आहे, ते म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षांत एकमेकांत धुसफूस सुरू आहे. ते कितीही एकत्र आले असले, तरी त्यांच्या नेत्यांत एकमेकांमध्ये एकमत होऊ शकत नाही. एकमेकांविषयीची नाराजी वाढत आहे. अशोक चव्हाण म्हणतात की माझ्या नगरपालिकेला निधीच मिळत नाही. सत्ताधारी असूनही त्यांचे बोलणे खूप काही सांगून जाते. ते उघडपणे नाराजी व्यक्त करतात. या नेत्यांच्या भांडणात जनता मात्र होरपळून निघत आहे. एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात मुख्यमत्र्यांची मोठी कसरत होत आहे. ते जनतेचे कामे करणार तरी कसे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीत दोन-तीन पक्षाचे सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना एकसंघ ठेवण्यात सरपंचांची कसरत होते. आपले पद टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ग्रामस्थांच्या कामांपेक्षा सदस्यांची नाराजी काढावी लागते. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारचे झाले आहे. एकमेकांत मेळ नसल्याने त्यांच्या कर्तृत्त्वानेच ते पायउतार होणार आहेत.

या कारणाने भाजप शांत

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात भाजपनेते शांत होते. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रय़त्न करीत होते. कोरोनाच्या काळात सरकार पडले असते, तर त्याचा ठपका भाजपवर आला असता. जनतेने भाजपलाच दुसणे दिली असती. त्यामुळे भाजप वर्षभर शांत होता. आता मात्र जनतेचे हाल पाहवत नाही. सरकारमधील पक्षात मेळ नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत. साहजिकच आपले प्रश्न घेऊन जनता भाजप नेत्यांकडेच येते. त्यामुळे आगामी काळात जोरदार हालचाली होऊन महाविकास आघाडी पडेल व भाजपची सत्ता येणार आहे, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

कर्डिले यांचा सल्ला मोलाचा

महाविकास आघाडी सरकार डिसेंबरपर्यंतच टिकणार आहे. त्यानंतर भाजप सत्तेत येईल, असे सांगून कर्डिले यांनी आगामी काळात होणाऱ्या घडामोडींबाबत सूचक वक्तव्य केले आहे. कर्डिले 25 वर्षे आमदार होते. मंत्रीही होते. त्यामुळे त्यांचे राज्याच्या राजकारणात विगळे स्थान आहे. वरिष्ठ पातळीवर वजन आहे. त्यांच्या बोलण्यात तथ्य असते. यापूर्वीही नगरची महापालिका असेल, की विधानसभांचे निकाल असतील, त्यांनी वारंवार केलेल्या वक्तव्याप्रमाणेच झाले आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या टप्प्यात अनेक नेते कर्डिले यांचाच सल्ला घेतात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य खूप काही सांगून जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com