आम्ही निधी मंजूर केला, कोण खरे, कोण खोटे ते जनतेला कळाले - We sanctioned funds, let the public know who is true and who is false | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही निधी मंजूर केला, कोण खरे, कोण खोटे ते जनतेला कळाले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 मार्च 2021

निळवंडेच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्यामुळे निळवंडे कृती समितीच्यावतीने थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

नगर : निळवंडेच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली. या कामासाठी आमच्या सरकारने निधी मंजूर केल्याने कोण खरे आणि कोण खोटे, हे जनतेला कळाले आहे, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.

निळवंडेच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्यामुळे निळवंडे कृती समितीच्यावतीने थोरात यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्याशी संवाद साधताना थोरात बोलत होते.

हेही वाचा..अमावस्येच्या यात्रेलाच देऊळ बंद

थोरात म्हणाले, की सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबध्द आहे. मागील सरकारने फक्त फसविण्याचे काम केले, मात्र आम्ही प्रत्यक्षात काम करत आहोत. निळवंडेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून, सन 2022 च्या पावसाळ्यातील धरणात साठलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार आहे.

या वेळी कृती समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, गोपीनाथ घोरपडे, दादासाहेब पवार, उत्तम घोरपडे, लता डांगे, डॅा. एकनाथ गोंदकर, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, डॅा. रविंद्र गागरे, रविंद्र वर्पे, रावसाहेब कोल्हे, धनंजय वर्पे, शहाजी गांगवे उपस्थित होते.

हेही वाचा.. प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले

दरम्यान, निळवंडे धरणाच्याकमासाठी थोरात नेहमीच आग्रही राहिले आहेत. आधि पुर्ववसन मग धरण ही संकल्पना मांडतांना स्वताची पाच एकर जमीन धरणग्रस्तांना दिली. धरण व कालव्यांच्या कामासाठी मंत्रालय पातळीवर स्रर्वाधिक प्रयत्न केले. त्यांच्या हातुनच हे सर्व कामे पूर्ण होणार आहेत, असे मत निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे यांनी व्यक्त केले,

हेही वाचा.. 

जिद्दीने मिळविलेले यश प्रेरणादाई असते

शेवगाव : कष्टाने व जिद्दीने मिळवलेले यश हे नेहमीच प्रेरणादायी असते. त्यातून अनेक जणांना कष्ट करण्याची व संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत असते. तालुक्यातील युवक याच आदर्शातून वेगवेगळ्या स्पर्धेसाठी तयार होतील, असे प्रतिपादन जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजी काकडे यांनी केले.

शेवगाव पोलीस ठाण्यातील शेखर डोमाळे, योगेश गणगे, संदीप दरवडे यांची खात्याअंतर्गत परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षपदी तर केंद्र सरकारच्या जीवन रक्षक पदक मिळाल्याबदल बाळासाहेब नागरगोजे यांचा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी अॅड. काकडे बोलत होते.

या वेळी अॅड.काकडे म्हणाले की, शेवगाव तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध नाहीत. भविष्यात काकडे शैक्षणिक समुह तालुक्यातील गोरगरीब मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार आहे. त्यातून अनेक अधिकारी घडतील याबाबत शंका नाही. कारण ग्रामिण भागातील विदयार्थ्यांमध्ये ती क्षमता आणि गुणवत्ता दडलेली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख