जिल्हा अनलाॅक असताना या गावचं ठरलं ! प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू - This village was decided when the district was unlocked! Public curfew every Saturday | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा अनलाॅक असताना या गावचं ठरलं ! प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू

सुहास वैद्य
बुधवार, 9 जून 2021

ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते व स्वेच्छेने हा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. इतर दिवशी दुकाने नेहमीप्रमाणे चालू राहतील. मात्र शुक्रवारचा आठवडे भाजी बाजार बंद राहील.

कोल्हार : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनलॉक केले असतानाच कोरोनाचा संसर्ग वाढू नये. म्हणून कोल्हार भगवतीपुर (ता.राहता) येथे दर शनिवारी जनता कर्फ्यू राहणार आहे. (This village was decided when the district was unlocked! Public curfew every Saturday)

ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते व स्वेच्छेने हा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. इतर दिवशी दुकाने नेहमीप्रमाणे चालू राहतील. मात्र शुक्रवारचा आठवडे भाजी बाजार बंद राहील. तसेच गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल कोल्हार मधील दुकाने सील केल्यानंतर आज विशेष बैठक बोलवीण्यात आली होती. माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला. त्यांनी सर्व व्यापार्यांची मते जाणून घेतली. तसेच जनता कर्फ्यु बाबत ग्रामपंचायतीची किंवा इतर प्रशासनाची कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्ट केले.

ॲड. खर्डे म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष येऊन दुकाने पाहण्याची वेळ येते. हे गावाच्या दृष्टीने योग्य नाही. व्यापाऱ्यांना एकच एक गोष्ट किती वेळा सांगायची. वास्तविक व्यापाऱ्यांचा लोकांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी त्यांना आदराने वागणूक द्यावी, असे ॲड. खर्डे  म्हणाले.

व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी व्यापाऱ्यांच्या लसीकरण प्राधान्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

योगेश कोळपकर म्हणाले, की बंदबाबत सर्वांना सारखा नियम ठेवला पाहिजे. कारवाई करताना छोटे मोठे व्यापारी असा भेदभाव केला असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवकुमार जंगम यांनी गावात नियमांची अंमलबजावणीबाबत ग्रामपंचायतीची जबाबदारी मोठी असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे म्हणाले, दुकानदारांनी दर पंधरा दिवसांनी आरटीपिसीआर चाचणी करून तपासणीचा अहवाल दुकानात ठेवावा.या बैठकीला ज्येष्ठ व्यापारी सुधाकर काळे, सुरेश निबे,पंढरीनाथ खर्डे, श्रीकांत बेद्रे, पप्पू मोरे, शिवाजी निकुंभ, सचिन मोहोडकर, असीर पठाण,गोरख खर्डे व सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे उपस्थित होते.

 

हेही वाचा..

थोरातांच्या मतदारसंघातील गावाचे काैतुक

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख