राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील - As the Vice Chancellor of Rahuri Agricultural University, Dr. Prashant Kumar Patil | Politics Marathi News - Sarkarnama

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

मुंबईतील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे.

राहुरी विद्यापीठ : मुंबईतील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी शनिवारी (ता. 27) डॉ. पाटील यांची नियुक्‍ती जाहीर केली. 

हेही वाचा.. जिल्हा बॅंकेची माळ कोणाच्या गळ्यात

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी विषयात बी. टेक. पदवी प्राप्त केल्यानंतर खरगपूरच्या आयआयटीमधून एम. टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटीमधून पीएच. डी. प्राप्त केली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मुंबई येथील केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे ते संचालक होते. लवकरच ते येथील पदभार घेतील. 

 

हेही वाचा... 

शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवा : आमदार लहू कानडे

राहुरी : "शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शासनाच्या महसूल विजय सप्तपदी योजनेची अंमलबजावणी करून जनतेचे प्रश्‍न वेळेत सोडवावेत. या कामी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,'' अशी तंबी आमदार लहू कानडे यांनी दिली.

हेही वाचा... आमदार काळे शरद पवारांना भेटले

देवळाली प्रवरा येथे नगरपालिका सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार कानडे बोलत होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सचिन गुजर, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, नगरसेवक अण्णासाहेब चोथे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक योगेश थोरात, सहायक निबंधक दीपक नागरगोजे, सहायक पोलिस निरीक्षक मधुकर शिंदे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर उपस्थित होते. 

आमदार कानडे म्हणाले, ""कोविडची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी नगरपरिषदेचे साह्य घेऊन देवळाली प्रवरा येथे रुग्णांची सोय करावी. कोरोना संकटात शासकीय यंत्रणेने स्वतः मास्क वापरून दुसऱ्याला त्यासाठी प्रवृत्त करावे, जेणे करून अनेक जीव वाचविल्याचे समाधान मिळेल. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या राहुरी तालुक्‍यातील 32 गावांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.''  नगराध्यक्ष कदम यांनी पालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही या वेळी दिली. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख