कर्जत-जामखेडमध्ये बारामती ॲग्रोच्या माध्यमातून जनावरांना लसीकरण

बारामती ॲग्रोच्या माध्यमातून 50 हजार लसीमागवून23 हजार लसी जामखेडसाठी व 27 हजार कर्जत येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडेसुपूर्द केलेआहेत.
rajendra pawar.png
rajendra pawar.png

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघात जनावरांना झालेल्या आजारामुळे नुकसान होऊ नये म्हणून बारामती ॲग्रोच्या माध्यमातून 50 हजार लसी मोफत देण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचे नुकसान टळणार आहे. 

बारामती ॲग्रोच्या माध्यमातून 50 हजार लसी मागवून 23 हजार लसी जामखेडसाठी व 27 हजार कर्जत येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. या दिलेल्या लसीच्या पुरवठयामधून ज्या गावांमध्ये आतापर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही, अशा गावांमध्ये या रोग प्रतिबंधासाठी लसीकरण करावयाचे आहे.

कर्जत-जामखेड तालुक्यात जनावरांना झालेल्या आजाराला रोखण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने बारामती ॲग्रो व अन्य संस्थाच्या माध्यमातून राजेंद्र पवार यांनी दोन्ही तालुक्यात जनजागृती, मार्गदर्शन व प्रत्यक्ष लसीकरण याबाबत कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले.

बारामती अग्रोलिमिटेड, के. जी. आयडी फाउंडेशन, कर्जत व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शाषण यांच्या सयुक्त विद्यमाने कर्जत- जामखेड तालुक्यात लंपीस्किन रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 

कर्जत व जामखेड तालुक्यात एकूण 2 लाख 27 हजार एवढे जनावरे आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार कालपर्यंत कर्जतमध्ये 1 हजार 218  व जामखेडमध्ये 204 जनावरांना बाधा झाल्याची आढळली. या रोगांमध्ये दुधाळ जनावरांना ताप येतो, अंगावरती फोड येतात, भूक कमी होते, पाणी कमी पितात, परिणामी त्याच्या शरीरामध्ये अशक्तपणा येतो आणि हा अशक्तपणा पुढील काही काळापर्यंत टिकू शकतो आणि कमीत कमी 21 दिवसांपर्यंत त्यांचे दूध उत्पादन कमी होते. म्हणजेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. याबद्दल सर्व विषय विशेषज्ञांबरोबर चर्चा केली असता असे निष्पन्न  झाले आहे की, या रोगावर प्रतिबंध करणे, हा एकच पर्याय आहे. हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर कुठलेही निश्चित असे औषध उपचार  नाही.

दरम्यान, जामखेड-कर्जतमध्ये जनावरांना लसीकरण करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळणार आहे. आजारग्रस्त जनावरांमुळे दुध उत्पादन कमी होत असून, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. आता लसीकरण होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com