या नेत्यांच्या बंगल्यावरून हलले `बिनविरोध`ची सूत्रे ! 17 बिनविरोध, 4 जागांसाठी होणार लढत - unopposed including Gadakh, Rajale! District Bank Election Rangala Retreat Game | Politics Marathi News - Sarkarnama

या नेत्यांच्या बंगल्यावरून हलले `बिनविरोध`ची सूत्रे ! 17 बिनविरोध, 4 जागांसाठी होणार लढत

मुरलीधर कराळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

21 जागांसाठी 198 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 173 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी इतरांचे अर्ज माघारीसाठी प्रयत्न केले. या दरम्यान तीन नेत्यांच्या बंगल्यावर आज बैठकामागे बैठका सुरू होत्या. अगदी अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या.

बॅंकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. तर इतर चार जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

21 जागांसाठी 198 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 173 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बिनविरोध उमेदवार असे 

सोसायटी मतदार संघ - अण्णासाहेब म्हस्के (राहाता) व चंद्रशेखर घुले (शेवगाव), मंत्री शंकरराव गडाख (नेवासे), विवेक कोल्हे (कोपरगाव), आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे), अमोल राळेभात (जामखेड), सीताराम गायकर (अकोले), अरुण तनपुरे (राहुरी), माधवराव कानवडे (संगमनेर), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव).
महिला प्रतिनिधी मतदारसंघ - अनुराधा नागवडे (श्रीगोंदे) व आशा काकासाहेब तापकिर (कर्जत).
शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघ - अमित अशोक भांगरे (अकोले).
विमुक्त जाती भटक्‍या जमाती मतदारसंघ - गणपतराव सांगळे (संगमनेर).
इतर मागासवर्ग - करण जयंतराव ससाणे (श्रीरामपूर)

सेवा संस्था मतदारसंघाच्या या चार जागांसाठी होणार लढत

नगर - शिवाजी कर्डिले विरुद्ध सत्यभामा बेरड.

पारनेर - उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले

बिगरशेती मतदारसंघातून - प्रशांत गायकवाड विरुद्ध दत्ता पानसरे

कर्जत - अंबादास पिसाळ विरुद्ध मीनाक्षी सांगळे

 

या दिग्गजांची माघार

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड व पांडुरंग अभंग, सत्यजित कदम, सुभाष पाटील.

यांच्या बंगल्यावर झाले खलबते

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शहरात तीन ठिकाणी बैठक झाल्या. या बैठकांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ रंगलेले होते. अंतिम क्षणापर्यंत बैठकाच्या ठिकाणावरून अर्ज माघारीसह अर्ज ठेवण्याचे सूत्र हालविले जात होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आमदार आशुतोष काळे यांच्या बंगल्यावर बसून सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावर माजी आमदार नरेंद्र घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या.

खासदार सुजय विखे विळद घाटातील कार्यालयात बैठका घेत होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख