मंत्री गडाखांच्या नेतृत्त्वाखाली मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध - Unopposed election of radish factory under the leadership of Minister Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाखांच्या नेतृत्त्वाखाली मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

विनायक दरंदले
मंगळवार, 19 जानेवारी 2021

कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 138 अर्ज दाखल झाले होते. मात्र, 117 इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी तेवढेच अर्ज राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केली.

कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भूमिका महत्त्वाची ठरली. 

कोरोनामुळे पुढे ढकलेल्या मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. कारखान्याचा कारभार व हित लक्षात घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत अनेकांनी इच्छांना मुरड घालत अर्ज मागे घेतले. 21 जागांसाठी तेवढेच अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. 

गटनिहाय बिनविरोध उमेदवार : सोनई- जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कारभारी डफाळ, घोडेगाव- बाबूराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, खरवंडी- भाऊसाहेब मोटे, बापूसाहेब शेटे, करजगाव- संजय जंगले, बबन दरंदले, दामोधर टेमक, नेवासे- नीलेश पाटील, नारायण लोखंडे, बाबासाहेब भणगे, प्रवरा संगम- बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, कडूबाळ कर्डिले, अनुसूचित जाती-जमाती- कडूबाळ गायकवाड, महिला प्रतिनिधी- तारा सुखदेव पंडीत, अलका रंगनाथ जंगले, इतर मागासवर्गीय- बाळासाहेब बनकर, मागास प्रवर्ग- बाळासाहेब परदेशी. 

अनेक इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखविला

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपास आलेल्या कारखान्याने नेहमी सभासदहित पाहिले. तालुक्‍याच्या अर्थकारणाचा हा कणा यापुढेही जपला जाईल. अनेक इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने हे शक्‍य झाले. 
- शंकरराव गडाख, जलसंधारणमंत्री 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख