विखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम  - The uncontested tradition of Vikhe Patil's village Loni Budruk continues | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्त्व मिळेल, आशा दृष्टीने सहमतीने उमेदवार निश्‍चित केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोणी : लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग 25 वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा यंदाही राखत आदर्श निर्माण केला आहे. 

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गावातील जेष्ठ व्यक्तींनी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. 

सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्त्व मिळेल, आशा दृष्टीने सहमतीने उमेदवार निश्‍चित केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

बिनविरोध निवडणूक आलेले उमेदवार असे ः प्रभाग 1 - भाऊसाहेब पंढरीनाथ धावणे, मंजुश्री सरोज साबळे, उज्वाला अर्जुन बोरसे. प्रभाग 2 - मध्ये रामनाथ वेणुनाथ विखे, गणेश रंगनाथ विखे, कल्पना विठ्ठल मैड. प्रभाग 3 - प्रविण भाऊराव विखे, उषा संतोष विखे. प्रभाग 4 - मयूर हरिष मैड, दिलीप जगन्नाथ विखे, शोभा संभाजी विखे. प्रभाग 5 - दीपक भाऊसाहेब विखे, सुनिता गोरक्षनाथ चव्हाण, सिंधुबाई सुभाष म्हस्के. प्रभाग 6 - मध्ये सचिन गुलाब ब्राम्हणे, कविता गोरक्ष दिवटे, सुचित्रा कैलास विखे आदी. 

हेही वाचा...

धार्मिक स्थळांच्या जिर्णोद्धाराचा संकल्प करीत खरवंडी बिनविरोध 

सोनई : खरवंडी (ता. नेवासे) येथील खंडोबा, महादेव मंदिर व ख्रिश्‍चन बांधवांचे प्रार्थनास्थळ जिर्णोद्धार करण्याचा संकल्प करून खरवंडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा मंडळात लढत झाली होती. 

येथील के. एम. फाटके महाराज, राम बोचरे महाराज व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र बसून इच्छुकांच्या नावाने चिठ्ठ्या केल्या. गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेवून पंधरा सदस्यांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा गट एकमेकांसमोर लढले होते. 

बिनविरोध सदस्य याप्रमाणे ः शिवाजी रामदास कुऱ्हे, गोरखनाथ श्रीधर शिदे, संतोष पंढरीनाथ बुचकुल, संगिता संतोष राजळे, वर्षा पोपट मिसाळ, आण्णासाहेब विष्णू बेल्हेकर, प्रियंका सतिश भोगे, सुशिला अरुण फाटके, हिराबाई भिमराज बर्डे, गणेश विलास खाटिक, सुर्वणा मुकुंद भोगे, गणेश मोहन फाटके, मनिषा चंद्रशेखर म्हस्के, हर्षदा संतोष भोगे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख