श्रीगोंद्यात अरुण काकांची अभेद्य फिल्डिंग पाचपुतेंना भेदता आलीच नाही ! - Uncle Arun's impressive fielding in Shrigonda could not penetrate Pachput! | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंद्यात अरुण काकांची अभेद्य फिल्डिंग पाचपुतेंना भेदता आलीच नाही !

संजय आ. काटे
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

राहुल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे बँकेचे बारा वर्षे संचालक होते. त्यांनी कुकडी कारखाना व बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. 

श्रीगोंदे ः  कुंडलिकराव जगताप यांच्या अकाली निधनाने त्यांंचा मुलगा माजी आमदार राहुल जगताप यांची ही जिल्हा बॅंकेची पहिलीच निवडणूक होती. त्यात त्यांना कुठलाही धोका होवू नये, यासाठी आमदार अरुण जगताप यांनी जातीने लक्ष दिले. ते बिनविरोध होईपर्यंत त्यांनी लावलेली फिल्डींग विरोधक विशेषतः आमदार बबनराव पाचपुते यांचा गट भेदू शकला नाही.

राहुल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे बँकेचे बारा वर्षे संचालक होते. त्यांनी कुकडी कारखाना व बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. राहुल जगताप यांनी आमदार व्हावे व जिल्हा बँकेत जावे, या त्यांच्या दोन्ही इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत.

हेही वाचा... कर्डिलेंनी थोरातांऐवजी अजितदादांकडे चकरा मारल्या असत्या तर गुलालाची पोती तशीच राहिली असती

जगताप हे बिनविरोध बँकेत जात असल्याने आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का बसला असतानाच काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे याही बिनविरोध झाल्याने तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांच्या हाती येते, की काय अशी शंका भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. जगताप यांनी बँकेत प्रखर विरोधानंतरही बँकेत अशा रितीने जात त्यांची राजकीय परिपक्वता सिध्द केल्याचे बोलले जाते.

विरोध मुठीत गुंडाळला

जगताप आमदारकीच्या निवडणुकीत थांबले, मात्र जिल्हा सहकारी बँकेत जाण्यासाठी बड्या-बड्यांना ताकत लावावी लागते तरीही यश मिळत नाही त्याच बँकेच्या राजकारणात श्रीगोंद्यातून सगळा विरोध मूठीत गुंडाळत थेट बिनविरोध जाण्याची किमया साधल्याने सहकारातील जाणत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

हेही वाचा... विखे पाटील, तनपुरेंनी कर्डिलेंना झुंजायला लावले 

जगताप यांना बँकेत जावू न देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते गटाने मोठी व्यूव्हरचना केली होती. विद्यमान संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी बँकेत जाण्याची पूर्ण तयारी केली होती. तालुक्यातील 168 सेवा संस्था मतदार आहेत. त्यांचे ठराव करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी यंत्रणा लागली होती. शेवटी जगताप भारी ठरले आणि पानसरे यांनी या मतदारसंघात अर्जच न भरता माघार घेतली.

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख