शिर्डीत अघोषित टाळेबंदी, करमाफीसाठी विखे पाटील यांचे सरकारकडे साकडे - Unannounced lockout in Shirdi, Vikhe Patil to go to government for tax exemption | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीत अघोषित टाळेबंदी, करमाफीसाठी विखे पाटील यांचे सरकारकडे साकडे

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 1 एप्रिल 2021

विखे पाटील यांनी येथील शिष्टमंडळासह शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत या समस्येबाबत चर्चा केली. यातून मार्ग काढू, असे आश्वासन शिंदे यांनी या भेटीत दिले.

शिर्डी : साईमंदिर खुले झाले, तरीही भाविकांच्या गर्दीअभावी साईबाबांच्या शिर्डीत अघोषित टाळेबंदी लागली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याने येथील मालमत्ताधारकांना कर व भाडेमाफी द्यावी, अशा आशयाचे निवेदन आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

विखे पाटील यांनी येथील शिष्टमंडळासह शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत या समस्येबाबत चर्चा केली. यातून मार्ग काढू, असे आश्वासन शिंदे यांनी या भेटीत दिले.

या वेळी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सुजीत गोंदकर, मंगेश त्रिभूवन, रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, अशोक गायके, अभिजीत संकलेचा तसेच व्‍यवसायीक उपस्थित होते.

या वेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, की शिर्डीची अर्थव्‍यवस्‍था साईभक्‍तांवर अवलंबून आहे. अनेक दिवसांनंतर मंदिर उघडले असले, तरी भाविक येत नसल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. 

राज्य सरकारने सर्व कर व भाडे वसुलीस माफी द्यावी, असा ठराव नगरपंचायतीने गेल्या 24 ऑगस्‍ट 2020 रोजी सरकारकडे पाठवीला आहे. या ठरावाचा सहानुभूतीने विचार करुन,तातडीने कर व भाडेमाफी द्यावी. 

हेही वाचा..

बाजारसमितीला भगवानबाबांचे नाव

पाथर्डी : पाथर्डीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रमुख प्रवेशव्दाराला संत भगवानबाबा व संत वामनभाऊ कृषी उपत्न्न बाजार समिती व बबनरावजी ढाकणे व्यापारी संकुल, असे नाव देण्याचा ठराव बाजार समितीने संमत केला आहे.

बाजार समितीच्या मिरी येथील शाखेला राष्ट्रसंत तनपुरे महाराज बाजार समिती मिरी असे नाव देण्यात येईल. तर मिरीच्या व्यापारी संकुलास रावसाहेब म्हस्के व्यापारी संकुल मिरी असे नामकरण करण्यात आले आहे.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आँनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सभापती बन्सीभाऊ आठरे, उपसभापती मंगल गर्जे, बाळासाहेब घुले, वैभव दहीफळे विष्णु सातपुते यांच्यासह सभासदांनी आॅनलाईन सहभाग नोंदविला.

अॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आली, तेव्हा समितीवर बारा लाखाचे कर्ज होते. ते कर्ज फेडुन कोरोनासारखे संकट असतानाही बाजार समितीने तिसगाव येथील विकास कामे, मिरी येथे जागा खरेदी, पाथर्डीच्या बाजार समितीमधील विकासाची कामे केली.

शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविण्याचे काम केले. बाजार समितीचे सचिव दिलीप काटे यांनी प्रसताविक केले. बाळासाहेब घुले यांनी आभार मानले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख