Two villages in Shrigonde taluka were sealed due to a corona-affected person at Daand | Sarkarnama

दौंडच्या कोरोना रुग्णांमुळे श्रीगोंद्यातील दोन गावे प्रतीबंधीत झोनमध्ये

संजय आ. काटे
सोमवार, 18 मे 2020

दौंड येथे आढळलेल्या अजून एका कोरोना रुग्णामुळे श्रीगोंद्यातील बफर झोनची दोन गावे प्रतीबंधीत क्षेत्र (कोन्टेंमेंट झोन) मध्ये आली आहेत. त्यामुळे निमगावखलू व गार या दोन गावे सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

श्रीगोंदे : दौंड येथे आढळलेल्या अजून एका कोरोना रुग्णामुळे श्रीगोंद्यातील बफर झोनची दोन गावे प्रतीबंधीत क्षेत्र (कोन्टेंमेंट झोन) मध्ये आली आहेत. त्यामुळे निमगावखलू व गार या दोन गावे सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, प्रतीबंधीत क्षेत्र जाहीर करुन पुढची कार्यवाही करण्यासाठी पुणे व नगरच्या प्रशासनातील समन्वयाचा अभाव समोर आला.

दौंड येथील गांधी चौकातील एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्या परिसरापासून तीन किलोमीटर अंतरावरील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले गेले. यात श्रीगोंदे तालुक्यातील गार व निमगावखलू ही दोन गावे आली आहेत. त्यामुळे या गावांच्या सरहद्दी सील करुन गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सगळे व्यवहार पूर्ण बंद करतानाच गावातील लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यातच निमगावखलू हे गाव नगर-दौंड महामार्गावर येत असल्याने प्रशासनाची अडचण वाढणार आहे.

यापुर्वी ही दोन गावे बफर झोनमध्ये होती. आता बफर झोनमध्ये कौठे गावाचाही समावेश झाला असून, निमगावखलू व गार ही दोन गावे प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत झाली आहेत.

दरम्यान, प्रतिबंधीत झोन लागू करण्याबाबत पुणे व नगर प्रशासनात समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. दौंड प्रांताधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत नगरला मेलवरुन प्रतीबंधीत गावांचे नावे कळविली, मात्र त्यात तारखा चुकुन ठेवल्या. शिवाय श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनीही ही बाब गांभीर्याने न घेता तो मेल दुर्लक्षीत केला. त्यामुळे या गावांमध्ये आज सकाळी प्रतीबंधीत झोनची कार्यवाही सुरु झाली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हमाले, आज सकाळी त्या गावातील सरहद्दी सील करण्याचे व होम-टू होम जावून पुन्हा तपासणी हाती घेणार आहोत. बफर झोनमध्ये या तपासण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी आता प्रतीबंधात्मक झोननूसार पुढील कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख