शिर्डीच्या साईबाबा देवस्थानच्या योग्य व्यवस्थापणासाठी तुकाराम मुंडेच हवेत !

श्री साईबाबांचे नाव देशासह जगभरात लौकिक असून, साईबाबांचा भक्त परिवार सर्वत्र आहे. नियमांवर बोट ठेवून नियमबाह्य कामावर अंकुश ठेवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे सर्वत्र परिचित आहेत.
tukaram munde.png
tukaram munde.png

श्रीरामपूर : शिर्डी येथील श्रीक्षेत्र साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना याबाबत मागणीचे निवेदन पाठविले.

श्री साईबाबांचे नाव देशासह जगभरात लौकिक असून, साईबाबांचा भक्त परिवार सर्वत्र आहे. नियमांवर बोट ठेवून नियमबाह्य कामावर अंकुश ठेवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे त्यांची शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यास देवस्थानचा आदर्श इतर देवस्थान घेतील. देवस्थानची खर्चाची होणारी उधळपट्टी थांबून विधायक कार्याला गती मिळेल. इतर खर्चाला फाटा देऊन देवस्थानच्या तिजोरीत मोठी भर पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिर्डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान आहे. दरवर्षी करोडो रुपयांच्या देणग्या देवस्थानला जमा होतात. सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच देवस्थानचे काम होणे अपेक्षित असताना तेथे राजकारण होते, असा आरोप कायम केला जातो. देवस्थानच्या विकासावर स्थानिक राजकारणाचा परिणाम होत असून, राजकारणविरहीत कामे होण्याची गरज आहे. देशभरातून येणारे भाविक साई संस्थानला मोठ्या देणग्या देतात. काही भाविक करोडो रुपयांच्या देणग्या देतात. या देणग्यांचा वापर योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. भाविकांचा एक रुपयाही मोलाचा असतो. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळांनी त्याचा जपून वापर करावा, यासाठी सक्षम अधिकारी असावा, अशी अपेक्षा भाविकांमधून होत आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने ममुख्यमंत्री तसेच संबंधतांना निवेदनेे दिली आहेत. तुकाराम मुंडे देवस्थानला शिस्त लावतील. संस्थानजवळ सुरू असलेले राजकारण रोखतील, त्यामुळे शिर्डी बरोबरच नगर जिल्ह्याचाही विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा आपच्या वतीने करण्यात आली आहे. 

देवस्थानाच्या वतीने सरकारला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यात शिर्डीतील व्यवस्था अपुरी पडते. संस्थानला मिळणाऱ्या निधीपैकी योग्य तो निधी वापरून शिर्डीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी साईबाबा भक्तांकडून होत आहे. 

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने योग्य तो निर्णय घेऊन मुंडे यांना संस्थानवर नियुक्ती द्यावी. संस्थानच्या वतीने केवळ भाविकांचीच नव्हे, तर स्थानिक नागरिकांनाही चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com