बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्या चिमुरडीलाच पेटविण्याचा प्रयत्न - Trying to set fire to her chimurdi to withdraw the crime of rape | Politics Marathi News - Sarkarnama

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्या चिमुरडीलाच पेटविण्याचा प्रयत्न

मार्तंड बुचुडे
रविवार, 16 ऑगस्ट 2020

यावरून सोशल मीडियावर राजकारण सुरू झाले आहे. महाआघाडीच्या सरकारच्या काळात असे गु्नहे घडत असल्याच्या पोस्ट विरोधकांतून सुरू झाल्या आहेत. तसेच महिला आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर कमेंट करणे सुरू केले आहे.

पारनेर : तालुक्यातील वाघुंडे शिवारात बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोघांनी संबंधित महिलेच्या दहा वर्षाच्या चिमुरडीलाच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रय़त्न झाला. त्यात ती भाजली आहे. याबाबत सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाघुंडे येथील एका 26 वर्षीय महिलेवर राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खुर्द ) यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांना अटक होऊन जामिनही मिळाला होता, मात्र दोन दिवसांपूर्वी गुरूवारी (ता. 13 ) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास दोघेही आरोपी आपल्या दुचाकीवरून फिर्यादीच्या वाघुंडे येथील कोपी जवळ गेले आणि आमच्यावरील बलात्काराची केस मागे घे. असे म्हणून त्यांनी तिला शिवीगाळही केली. त्याच दरम्यान फिर्यादी 26 वर्षीय महिलेची 10 वर्षाची छोटी मुलगी बाहेर आली. त्याच वेळी राजाराम तरटे याने मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकले व अमोल तरटे याने मुलीच्या अंगावर पेटती काडी फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या मुलीचा फ्रॉक पेटला व त्यात ती मुलगी गंभीर भाजली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी सकाळी वाघुंडे शिवारात घडली असल्याची फिर्याद सुपे पोलीस ठाण्यात 26 वर्षीय महिलेने दिली आहे.

याबाबत दोघा आरोपींच्या विरोधात सुपे पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून सोशल मीडियावर राजकारण सुरू झाले आहे. महाआघाडीच्या सरकारच्या काळात असे गु्नहे घडत असल्याच्या पोस्ट विरोधकांतून सुरू झाल्या आहेत. तसेच महिला आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर कमेंट करणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील या सरकारचा पोलस प्रशासनावर वचक नाही, अशा पोस्ट येऊ लागल्या आहेत.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख