पुणे जिल्ह्यातील आदिवासींचा आंदोलनाचा इशारा, पिचड यांना साकडे - Tribal warning of agitation in Pune district | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्ह्यातील आदिवासींचा आंदोलनाचा इशारा, पिचड यांना साकडे

शांताराम काळे
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पिचड साहेब, तुम्हीच आमचे माय बाप आहात. तुम्हीच आमचे राष्ट्रीय नेते व पक्ष असून, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र ही तुमच्यासोबत आहे.

अकोले : जुन्नर तालुक्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन च्या संकटात आदिवासी उध्वस्त होणार असून, धनगर आरक्षण देताना आदिवासींच्या हक्काला बाधा आणू नये, खावटी अनुदान मिळावे, तर आदिवासी धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करू. याबाबत आमचे नेते तुम्हीच आहात. तुम्हीच या प्रश्नी लक्ष घाला, अशी विनंती माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे करीत पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी पिचड यांना साकडे घातले.

``पिचड साहेब, तुम्हीच आमचे माय बाप आहात. तुम्हीच आमचे राष्ट्रीय नेते व पक्ष असून, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसा व आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही आंदोलन करतो`` अशी भूमिका पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी घेतली आहे.

राजूर येथे आदिवासी संघटना व कार्यकर्ते  माजी मंत्री मधुकर पिचड यांना भेटण्यासाठी आले होते. या वेळी माजी आमदार वैभव पिचड, जुन्नर तालुक्याचे जेष्ठ नेते दादाभाऊ बगाड, गोविंद साबळे, तुळशीराम भोईर, नारायण साबळे,  बुवा शिंगाडे, काळू शिळकांडे, किसान केदारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानी माजी मंत्री पिचड यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली.

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले असून, खावटी अनुदान नाही. जुन्नर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोनमुळे आदिवासी उध्वस्त होत आहे. याबाबत आमदार बेनके याना भेटून निवेदन दिले.  मंत्रिमंडळात प्रश्न मांडतो असे म्हणाले, ते आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर आरक्षण देणार असेल, तर आम्ही ते होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्र घेऊ, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख