नगर : जिल्ह्यात आज कोरोनाचे 435 रुग्ण वाढले असून, आतापर्यंत 6 हजार ३४६ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, आजपर्यंत 4 हजार 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३, अँटीजेन चाचणीत १९४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २८, संगमनेर २, पाथर्डी १, नगर ग्रामीण ३, कॅन्टोन्मेंट ३, पारनेर ३, शेवगाव १, कोपरगाव १ आणि जामखेड येथील १ रुग्ण यांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळून आले.
यामध्ये महापालिका ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ८, नेवासे ८, श्रीगोंदे १७, पारनेर ८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६ आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर शहरात १६४, संगमनेर ८, राहाता १, पाथर्डी ७, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर १, पारनेर २ अकोले १, राहुरी १, शेवगाव १, कोपरगांव १ आणि कर्जत येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.
नगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ दिसून येत आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने हा आकडाही मोठा दिसत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने प्रशासनाला उपाययोजना करण्यात यश येत असल्याचे मानले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधून जनतेच्या प्रश्नांची दखल घेत उपापयोजना केल्या आहेत. कोविड सेंटर नव्याने वाढविण्याचे नियोजन करण्यात येत असून, आलेल्या सर्व रुग्णांवर प्रशासन योग्य पद्धतीने उपचार करीत असल्याने रुग्णांना होम क्वारंटाईन करून उपचार करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, श्रीगोंदे शहरात रुग्ण वाढू लागल्याने तीन दिवस तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत असली, तरी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याने लवकरच रुग्ण आटोक्यात येतील, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संपूर्ण लाॅकडाऊनला परवानगी मिळत नसल्याचे दिसून येत असून, आगामी काळात लाॅकडाऊन न करता कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

