प्रसाद तनपुरे यांचा आजचा वाढदिवस सोन्याचा कारण... - Today's birthday of Prasad Tanpure is the reason for gold ... | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसाद तनपुरे यांचा आजचा वाढदिवस सोन्याचा कारण...

मुरलीधर कराळे
मंगळवार, 21 जुलै 2020

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगर जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांची वेगळी छाप आहे. पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध त्यांचे पूत्र मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कामे आले.

नगर : उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारप्राप्त माजी खासदार प्रसाद बाबुराव तनपुरे यांचा आज वाढदिवस. तनपुरे यांचा जन्म 21 जुलै 1942 रोजी झाला. सध्या 78 व्या वर्षीही त्यांचे मार्गदर्शन त्यांचे पूत्र उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना राजकारणात महत्त्वाचे ठरते आहे. मुलाने मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण केल्याने त्यांचा आजचा वाढदिवस सोन्याचा ठरला आहे.

पाच वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केलेले व एक वेळा खासदार राहिलेले प्रसाद तनपुरे यांचे शिक्षण बी. एस्सी. झाले. त्यांनी विविध पदांवर काम करून राहुरी तालुक्याचा विकास केला. विद्यानसभेचे पिठासीन अधिकारी, विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्षपद, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, राहुरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, मुळा सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, डाॅ. बाबुराव तनपुरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे संचालक, राहुरी तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष असे विविध पदांवर काम करून त्यांनी तालुक्यात योजना आणल्या. 

प्रसाद तनपुरे यांचे वडील सहकार क्षेत्राच्या चळवळीतील मोठे नेते असलेले डाॅ. बाबुरावदादा तनपुरे यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ युवक काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षांपासून झाला. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष नाव कमावले होते. 1998 मध्ये त्यांनी तत्तालिन कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. विधानसभेचे 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व करूनही त्यांना मंत्रीपदापर्यंत पोहचता आले नाही, त्याचे शल्य त्यांना होते. ती भर त्यांचे पूत्र प्राजक्त तनपुरे यांनी भरून काढली. राज्याचे उर्जामंत्री म्हणून मुलाला संधी मिळाल्याने प्रसाद तनपुरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगर जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांची वेगळी छाप आहे. पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध त्यांचे पूत्र मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कामे आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख