जामखेडमध्ये तीन दिवसांचा जनता कर्फ्यू, आमदार रोहित पवार यांचा निर्णय - Three-day public curfew in Jamkhed, decision of MLA Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

जामखेडमध्ये तीन दिवसांचा जनता कर्फ्यू, आमदार रोहित पवार यांचा निर्णय

वसंत सानप
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामखेड शहरात पुन्हा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ता. 16 ते 18 जुलै दरम्यान संपूर्ण शहर बंद राहणार आहे.

जामखेड : कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामखेड शहरात पुन्हा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ता. 16 ते 18 जुलै दरम्यान संपूर्ण शहर बंद राहणार आहे. आमदार रोहित पवार व प्रशासनाच्या झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसाच्या काळात दवाखाने व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा व आस्थापना बंद राहणार आहेत.

कोरोनामुळे तालुक्याची परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. कोरोनाचा शिरकाव आता थेट ग्रामीण भागात होत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. पंधरवाड्यात ही संख्या दहावर पोहचली. यापैकी तिघेजण बरे झाले. तर सात जण क्वारंटाईन आहेत. खबरदारी म्हणून आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची रविवारी जामखेडला बैठक झाली. या वेळी या आठवड्यात जनता कर्फ्यू वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. या आठवड्यात तीन दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.'मेडिकल व हाँस्पिटल वघळता सर्व अस्थापना या काळात बंद राहणार आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम अधिकची लोकसंख्या असलेल्या जामखेड व खर्डा परिसरात होऊ नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना प्रशासनाने हाती घेतली आहे. जामखेड व खर्डा येथे तीन दिवस जनता कर्फ्यू  पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

पूर्वानुभवाच्या बळावर संटावर मात करणार

जामखेड तालुक्यात कोरोनाचे संकट गडद होत असले, तरी येथील लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांनी या संकटातून यापूर्वी जामखेडकरांना बाहेर काढले आहे. एक मिशन म्हणून काम केले आहे. जामखेडकरांचा स्वतःचा पॅटर्न तयार करून निर्माण झालेले संकट परतवून लावले होते. लाॅकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या हाॅट स्पाॅटमधून जामखेडकरांना सहीसलामत बाहेर काढले होते. याकरिता राबविलेले विविध उपक्रम व उपाययोजनांमधून तालुक्याचा स्वतंत्र पॅटर्न तयार झाला आणि तो राज्यभर चर्चेचा ठरला. 

या कामी आमदार कार्यालयाच्या टीमने संपूर्ण तालुक्यात सक्रिय पुढाकार घेऊन कर्तव्य तत्परता दाखवली. या टीमला तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, डॉ. युवराज खराडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी एकत्रित पणे सहकार्य केले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनतेने दिलेला येथील लढा राज्यभर जामखेड पॅटर्न या नावाने चर्चेत आला.

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवहन

जामखेड तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर  मात करण्यासाठी एकजुटीने स्वःशिस्तीचे पालन करून हे संकट परतवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पायीक होऊ या. रस्त्यावर फिरु नका, अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडा. अन्यथा घरात बसून स्वतः ची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. सोशल डिस्टिंगशन पाळा .मास्क वापरा. स्टरलायजेशनकरिता सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन तहसीलदार नाईकवाडे यांनी केले आहे.

आमदार पवार यांनी घेतली रुग्णांची भेट

जामखेड येथील एकात्मिक ग्रामीण आरोग्य प्रकल्प असलेल्या आरोळे हॉस्पिटलला भेट देऊन नियोजनासंदर्भात प्रशासकीय अधिकारी व डॉक्टरांशी चर्चा केली. या वेळी तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तब्येतीचीही विचारपूस केली आणि काळजी घेण्यास सांगून आमदार रोहित पवार यांनी लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख