रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघांसह तिघांना अटक ! आता शोध मास्टरमाईंडचा - Three arrested for killing Rekha Jare Now the search for the mastermind | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघांसह तिघांना अटक ! आता शोध मास्टरमाईंडचा

मुरलीधर कराळे
बुधवार, 2 डिसेंबर 2020

वघ्या चोवीस तासात त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्यासाठी पाच पोलिस पथके तयार केले.

नगर : यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही हत्या सुपारी देऊनच झाल्याचे संबंधित आरोपींनी सांगितले असल्याचे समजते. त्यामागे मास्टरमाईंड कोण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

अवघ्या चोवीस तासात त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्यासाठी पाच पोलिस पथके तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या टीमने आरोपीला पकडले आहे. राहाता तालुक्यातून कोल्हार येथून या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून, सुपारी देऊनच खून केल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते.

या प्रकरणाशी संबंधित आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामागे बडे प्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.आता जरे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाैकशी होऊन त्यामागील मास्टरमाईंड शोधला जाणार आहे.

गाडीला कट मारल्याचेे कारण नाहीच

रेखा भाऊसाहेब जरे (वय 40) यांची सोमवारी रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाली. पुण्याहून नगरकडे येताना जातेगाव घाटात त्यांना दोघा मोटारसायकलस्वारांनी अडवून कट मारल्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची केली. त्यातूनच जरे यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आरोपी पळून गेले. जरे यांच्या सोबत असलेल्या बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी गाडी चालवत सुप्यापर्यंत आणले. त्यानंतर जरे यांना रुग्णवाहिकेतून नगरच्या शासकीय रुग्णालयात आणले, तोपर्यंत त्या मृत झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. याबाबत जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांनी सुपे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, हा हल्ला एक कट असल्याची शंका पोलिसांना येत होती. त्यानुसार पोलिसांचे पाच पथके नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपे पोलिस ठाणे, पारनेर पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे व तोफखाना पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जरे या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. अनेक आंदोलनात त्या सहभागी होत होत्या. महिलांच्या प्रश्नांत त्या लक्ष घालून अधिकाऱ्यांना जाब विचारीत असत. त्यांच्या खूनामागे नेमके काय कारण आहे, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख