"नगर अर्बन'च्या शाखाधिकाऱ्यांसह तिघांना अटक - Three arrested, including Nagar Urban branch officials | Politics Marathi News - Sarkarnama

"नगर अर्बन'च्या शाखाधिकाऱ्यांसह तिघांना अटक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्‍याम बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्‍नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष लांडगे यांनी कट रचून खोटी कागदपत्रे तयार करून तीन कोटी रुपयांचा अपहार केला.

नगर : नगर अर्बन बॅंकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आज पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यात बॅंकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी घनश्‍याम अच्युत बल्लाळ, मुख्य लिपिक राजेंद्र विलास हुंडेकरी, मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील व कनिष्ठ अधिकारी स्वप्नील पोपटलाल बोरा यांचा समावेश आहे. 

या तिघांनी मुख्य आरोपींना मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्‍याम बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्‍नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष लांडगे यांनी कट रचून खोटी कागदपत्रे तयार करून तीन कोटी रुपयांचा अपहार केला.

हेही वाचा... परीक्षा रद्दचा निर्णय विश्वासघातकी

यात ठेवीदार व सभासद यांची फसवणूक केल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपींना मदत करणारे व गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या चार आरोपींना आज पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी व त्यांच्या पथकाने अटक केली. दरम्यान या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. 
 

हेही वाचा...

शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज 

नगर : "अनेक अडचणींवर मात करीत शेतकरी पशुपालनाचा जोडधंदा करतो. साथरोगामुळे अनेकदा पशुधन दगावते. या अडचणीच्या काळात त्यांना मदत होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून आर्थिक मदत करण्यात येत आहे. या वर्षी 69 लाभार्थींना 4 लाख 94 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील वर्षी ही तरतूद वाढविण्यात येईल,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. 

हेही वाचा... वसुलीत भेदभाव नाही

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे, ज्या शेतकऱ्यांचे साथीचे रोग, विषबाधा, विजेचा धक्का बसून पशुधन दगावले, त्यांना सेस निधीतून भरपाईचे धनादेश देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, उमेश परहर, मीरा शेटे, काशिनाथ दाते, सदस्य प्रभावती ढाकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. वृषाली भिसे आदींसह लाभार्थी उपस्थित होते. 

सभापती गडाख म्हणाले, ""शेतकऱ्यांसाठी पशुधन मोलाचे असते. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्या पालनातून त्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते. साथीच्या आजारांमुळे किंवा अन्य कारणांमुळे हे पशुधन दगावल्यास त्याच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण होतो. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला जिल्हा परिषदेने सेस निधीतून मदतीचा हात दिला आहे. ही योजना राबविणारी नगर जिल्हा परिषद राज्यातील पहिलीच आहे.'' 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख