हजारेंच्या उपोषणाचा भाजपला धसका ! राळेगणला आज येणार देवेंद्र फडणवीस - Thousands go on hunger strike Fadnavis will come to Ralegan | Politics Marathi News - Sarkarnama

हजारेंच्या उपोषणाचा भाजपला धसका ! राळेगणला आज येणार देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

स्वामीनाथन आयोगानुसार शेती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी हजारे उपोषण आंदोलन करणार आहेत.

राळेगणसिद्धी : नवी दिल्लीच्या सीमेवरती दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने मोदी सरकार अडचणीत आले आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ३० जानेवारी महात्मा गांधीजींच्या पुण्य तिथीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत आज (शुक्रवारी) सायंकाळी येत आहे.

स्वामीनाथन आयोगानुसार शेती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी हजारे उपोषण आंदोलन करणार आहेत. हजारे यांनी सन २०१८ व २०१९ या  दोनही वर्षी आंदोलन केले होते. या वेळी पंतप्रधान कार्यालय, तत्कालिन कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत तसेच कृषीमंत्री राधामोहन सिंह, फडणवीस यांनी हजारे यांना लेखी आश्वासन दिले होते. त्यात केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. तसेच केंद्रीय कृषिमूल्य आयोग आला स्वायत्तता देण्यासाठी अधिकार समिती आपण तातडीने स्थापन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही. हजारे यांनी अनेकदा पत्र पत्रव्यवहार केला. परंतु त्याचे काही उत्तर आले नाही. काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते संसदेमध्ये त्यांचे गुणगान गात होते आणि आता पत्राचे साधे उत्तरही दिले जात नसल्याने सरकार सूड बुद्धीने वागत असल्याची भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. हे सरकार खोटी आश्वासने देते हे असा आरोप करत हजारे यांनी उपोषण आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे.

 

हेही वाचा..

संविधान जागर आॅनलाईन व्याख्यानमाला

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळीच्या वतीने दिवंगत संदीप खताळ यांच्या स्मृतीनिमित्त संविधान जागर ही ऑनलाईन व्याख्यानमाला होणार आहे. शुक्रवार ता. 22 ते 26 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

ते म्हणाले, की दिवंगत संदीप खताळ या हरहुन्नरी तरुणाचे नुकतेच अकस्मात निधन झाले. ही घटना सर्व संगमनेरकरांसाठी अत्यंत दुःखदायक होती. दिवाळीच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली नेटक्या नियोजनात झालेली आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स अतिशय लोकप्रिय ठरली होती. त्यांची स्मृती म्हणून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या अंतर्गत शुक्रवार ( ता. 22 ) रोजी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे लोकशाही समाजवाद, शनिवार ( ता. 23 ) रोजी एस.एम. जोशी फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त प्रा. सुभाष वारे यांचे स्वातंत्र्य आणि समता, रविवार ( ता. 24 ) रोजी सुधीर लंके यांचे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय या विषयावर, सोमवार ( ता. 25 ) रोजी ज्ञानोदय विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता पानसरे यांचे समता या विषयावर तर मंगळवार ( ता. 26 ) रोजी संविधान संस्कृती या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक व आमदार लहू कानडे यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे आमदार डॉ. सुधीर तांबे समारोपप्रसंगी सर्वांशी संवाद साधणार आहेत.

ही व्याख्यानमाला जय हिंदच्या ऑनलाइन पेजवर प्रसारित करण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे व जयहिंद लोक चळवळीच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख