मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधमांना फाशी द्यावी : अण्णा हजारे - Those who abused the girl child should be hanged: Anna Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधमांना फाशी द्यावी : अण्णा हजारे

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

हजारे यांनी आज हाथरस घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला व या घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा होणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.

पारनेर : उत्तर प्रदेशमधील हाथरस गावामध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला, ही बाब मानवतेला कलंक फासणारी आहे. ही घटना म्हणजे केवळ एका मुलीची हत्या नसून अऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहिजे, कारण समाजात पुन्हा कोणाकडूनही असे कृत्य होऊ नये, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हजारे यांनी आज हाथरस घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला व या घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा होणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे. पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, ही घटना म्हणजे मानवतेला व भारतीय संस्कृतीला काळीमा आहे. भारत हा ऋषीमुनींचा देश म्हणून ओळखला जातो. आपली संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि अशा देशात अशा घटना घडणे म्हणजे देशाची मान झुकावयाला लावणाऱ्या आहेत. देशातील ही घटना म्हणजेच चिंताजनक बाब असून, या भागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत असल्याची खंत ही हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख