उद्धव ठाकरे आणि अजितदादांना भेटलेले पारनेरमधील ते नगरसेवक होम क्वारंटाईन

मुंबईहून आल्याच्या कारणावरून पारनेर नगरपंचायतीने मुंबईहून आलेल्या सर्वांना होम क्वारंटाईन केले आहे.
parner councilors
parner councilors

पारनेर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांना नुकतेच मुंबई येथे मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तेथे त्यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला. मुंबईहून आल्याच्या कारणावरून पारनेर नगरपंचायतीने मुंबईहून आलेल्या सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन केले आहे.

पारनेर नगरपंचायतीने तसे पत्र तहसीलदारांना दिले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमाताई  बोरूडे, नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने आदींचा क्वारंटाईन होण्यामध्ये समावेश आहे.

पारनेर नगर पंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले होते. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही राज्यात मित्र पक्ष सत्तेत असल्याने अंतर्गत पक्षप्रवेश योग्य नव्हता. या कारणाने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबते झाले. त्यामुळे हे पाच नगरसेवकांना पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पाठविले. तेथे सर्वांना पुन्हा शिवसेनेत घेण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे हे सर्व मुंबईला थांबले गेले होते. त्यासाठी त्यांनी अधिकृतपणे ई-पास घेतला होता. त्यानुसार नगरपंचायतीने त्या सर्वांना क्वारंटाई करण्याचे पत्र तहसीलदारांना दिले. त्यानुसार हे सर्वजणांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्यांनी मुंबई प्रवास केल्याने क्वारंटाईन : डाॅ. कुमावत

पाच नगर सेवकांसह महिला अघाडी प्रमुखांनी कामानिमित्ताने प्रवास करण्यासाठी लागणारा ई-पास काढून एक दिवसांचा मुंबई प्रवास केला होता. त्यांनी तेथे फक्त कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांच्याच भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा इतर जनतेशी संबध आला नसल्याने त्यांनी सुरक्षा समितीस सांगितले आहे. म्हणून त्यांना फक्त सात दिवसांसाठी व तेही त्याच्याच घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे, असे नगरपंचायतीच्या कोरोना समितीच्या सचिव डॉ. सुनिता कुमावत यांनी सांगितले.

आम्ही होम क्वारंटाईन झालो : सय्यद

आम्ही रितसर ई-पास काढून एक दिवसांचा मुंबई प्रवास केला आहे. आमचा कार्यालयीन लोकांशिवाय इतर कोणाशीही संपर्क आला नाही. तरीसुद्धा जनतेच्या व आमच्याही कुटुंबाच्या सुरक्षततेसाठी आम्ही क्वारंटाईन झालो आहोत. सरकारी नियमानुसार आम्हाला सात दिवसांसाठी होमक्वारंटाईन करण्यात आले आहे, असे नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com