थोरात समर्थक वराने वधु आणली बैलगाडीतून ! इंधनदरवाढीचा असाही निषेध - Thorat supporter groom brings bride from bullock cart! Such is the protest against fuel price hike | Politics Marathi News - Sarkarnama

थोरात समर्थक वराने वधु आणली बैलगाडीतून ! इंधनदरवाढीचा असाही निषेध

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 2 मार्च 2021

होय, आम्ही दोन्ही बाजूंची मंडळी त्यांचे समर्थक आहोत. त्यांच्या हाकेला ओ द्यायला आम्ही सदैव तयार असतो.

शिर्डी : काल विवाहबध्द झालेल्या एका नवदांपत्याने लग्नमंडपासून आपल्या घरापर्यंतचा प्रवास सजविलेल्या बैलगाडीतून केला. इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी त्याने ही बैलगाडी सफर केली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील कोल्हेवाडी येथे अधिराज काकड व ज्ञानेश्वरी वामन हे दोघे काल विवाहबध्द झाले. तेथून पाच किलोमिटर अंतरावर जोर्वे हे अधिराजचे गाव. तेपर्यंतचा प्रवास या दोघांनी बैलगाडीतून केला.

हेही वाचा... मी मंत्री असतो, तर राजीनामा दिला असता

आता योगायोग असा की जेथे नवदांपत्याने ही बैलगाडी सफर केली, त्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. आणि जेथील नवरदेवाने मोदी सरकारचा इंधनदरवाढी बाबत निषेध केला ते जोर्वे गाव हे काॅग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव आहे.

हे दोन्ही नेते एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे नवदांपत्याची हि बैलगाडी सफर चर्चेचा विषय ठरली नाही तरच नवल. जेथे दोन तुल्यबळ नेत्यात संघर्ष असतो तेथील राजकारणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठा सन्मान असतो. तेथील कार्यकर्त्यांच्या राजकीय जाणिवा देखील अधिक तीव्र असतात. वधू आणि वराकडील दोन्ही मंडळी थोरात समर्थक त्यामुळे त्यांनी विवाहसोहळ्याचे औचित्य साधून इंधन दरवाढीवर बरोबर हा अस अचूक निशाणा साधला. 

हेही वाचा... कोल्हार घोटी रस्त्यासाठी सात कोटी

शिर्डी विधानसभा मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील सव्वीस गावे समाविष्ट झाली आहेत. तेथे विखे आणि थोरात या दोन्ही नेत्यांत ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा निवडणुकी पर्यत कधी जोरदार संघर्ष होतो, तर कधी तहाची बोलणी होतात. संघर्ष असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून विशेष सन्मान मिळतो. विकासकामांची स्पर्धा सुरू असते. याउलट प्रतिस्पर्धी नाही अशा भागात स्पर्धा नसते. कार्यकर्त्यांना तुलनेत एवढे महत्वही देखील नसते.

जोर्वे येथील अधिराज काकडे आज म्हणाले, की मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काल विवाह विधी झाल्यानंतर मी नववधुला बैलगाडीने घरी घेऊन आलो. 
तू महसूल मंत्री थोरात यांचा समर्थक आहेस का. असे विचारले असता तो म्हणाला, होय, आम्ही दोन्ही बाजूंची मंडळी त्यांचे समर्थक आहोत. त्यांच्या हाकेला ओ द्यायला आम्ही सदैव तयार असतो.

दरम्यान, या प्रकाराची महाराष्ट्रभर चर्चा आहे.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख