त्यांना उत्तर देण्याची मला गरज नाही ! पडळकर यांचा रोहित पवार यांच्यावर पलटवार ! - They don't have to answer! Padalkar's retaliation against Rohit Pawar! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

त्यांना उत्तर देण्याची मला गरज नाही ! पडळकर यांचा रोहित पवार यांच्यावर पलटवार !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

जालन्यातील चिंचोली गावात आज एका कुटुंबाच्या भेटीसाठी पडळकर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार पवार यांच्या टिकेला उत्तर दिले.

जालना : मी कुणाच्या खांद्यावर, मांडीवर किंवा पायाशी बसलोय, हे लोकांना माहित आहे, त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही, असा पलटवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केला.

जालन्यातील चिंचोली गावात आज एका कुटुंबाच्या भेटीसाठी पडळकर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार पवार यांच्या टिकेला उत्तर दिले.

आज सकाळी औरंगाबादकडे जाताना आमदार पडळकर यांनी मिरजगाव येथे खड्ड्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करीत आमदार रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्याला लगेचच पवार यांनी खरमरीत शब्दांत उत्तर देत त्यांच्यावरच पलटवार केला. याला उत्तर देताना पडळकर यांनी आमदार पवार यांनी केलेल्या टिकेकडे विशेष लक्ष न देता आपण काम करीत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, मी कुणाच्या खांद्यावर, मांडीवर आणि पायाशी बसलोय, हे लोकांना माहिती आहे. खूप वर्षांपासून राज्याच्या राजकारणात काम करीत असल्याने मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. अनेक वर्षे राज्यात तुम्ही सत्तेत असताना गावागावात तुम्ही रस्ते देऊ शकला नाहीत. त्यासाठी केंद्रात नितीन गडकरी यांनी रस्त्याचे मंत्री होऊन अनेक गावे, अनेक शहरे काॅंक्रेकीटरणाने जोडली. सध्या भोकनदर रस्त्यावर आपण उभे आहोत. हाही रस्ता डांबरीकरण झाला. मी सकाळी मिरजगावातून जात असताना मला खड्डेच खड्डे दिसते. मी विरोधी पक्षात आहे. लोकांचे प्रश्न मांडणे आमचे काम आहे. तुम्ही पंतप्रधानांपर्यंत पत्र लिहिता, पत्र लिहिण्यासाठी तु्म्ही माणसे नेमली, हे करीत बसण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी मी सरकारकडे केली आहे, असे ते म्हणाले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख