They do Sudarshan Kriya to reduce stress | Sarkarnama

नगरचे महापाैर शिकले प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी `सुदर्शन क्रिया`

मुरलीधर कराळे
शनिवार, 16 मे 2020

सध्या कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घरूनच अनेक कामे करावे लागत आहेत. त्यात वेळही मिळतो. त्यामुळे वेळेचा सदउपयोग करीत महापाैर वाकळे यांनी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला.

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत्या रुग्णांमुळे शहरातील पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य विभाग, प्रशासन आदींमधील सर्व कर्मचाऱ्यांना सध्या मानसिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नगरचे प्रथम नागरिक महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी आर्ट आॅफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया असलेल्या हॅपीनेस प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला. आता ते रोज मनशांतीची अनुभूती घेत आहेत.

शहरात सध्या कोरोनाच्या रुग्णात वाढ होताना अधिकारी, पदाधिकाऱ्यांचाही ताण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ताण कमी करण्यासाठी योगा, व्यायाम, प्राणायाम करावा लागत आहे. मात्र दिवसभर काम, रात्रीही अत्यावश्यक म्हणून अनेकदा दूरध्वनीवरून पदाधिकाऱ्यांना चर्चा करावी लागते. त्यामुळे झोपही व्यवस्थित होत नाही, अशी स्थिती आहे. यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. अशाही परिस्थितीत नगरचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी आपला नियमित व्यायाम सुरूच ठेवला. त्यासोबतच लाॅकडाऊनच्या काळात श्रीश्री रविशंकर यांनी संशोधित केलेली सुदर्शन क्रीयाही ते शिकले.  

रोजच्या व्यायामात मेडिटेशनची भर
सध्या कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घरूनच अनेक कामे करावे लागत आहेत. त्यात वेळही मिळतो. त्यामुळे वेळेचा सदउपयोग करीत महापाैर वाकळे यांनी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला. त्यानुसार सोशल डिस्टन्स ठेवत व शासकीय सर्व नियमांचे पालन करीत विशेष अनुभवी प्रशिक्षक पद्माकर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहभाग नोंदविला. रोज दोन तास याप्रमाणे चार दिवसांत हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आता यापुढे रोज 27 मिनीटे ते मेडिटेशन करणार आहेत. ते सध्या रोज पहाटे उठून व्यायाम करतात. लाॅक डाऊनमुळे घरीच चालण्याचा व्यायामही असतो. सुमारे 45 मिनीटात हा व्यायाम उरकतो. आता मानसिक तणाव दूर करण्यासाठी शिकलेलेली सुदर्शन क्रीया ते रोज 27 मिनीटे करीत आहेत.   

शारीरिक व मानसिक व्यायाम महत्त्वाचा
कोरोनाच्या काळात वेळ मिळाल्याने मी आर्ट आॅफ लिव्हिंगचा सुदर्शन क्रीया असलेला अभ्यासक्रम पूर्ण केला. तज्ज्ञ प्रशिक्षक कुलकर्णी यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे हा अभ्यासक्रम मी पूर्ण करू शकलो. याद्वारे खूप वेगळी अनुभूती मिळविली आहे. यापुढे माझ्या नित्य व्यायामात सुदर्शन क्रीयाही होत आहे, अशी प्रतिक्रिया महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी `सरकारनामा` शी बोलताना दिली. 

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवावी
आरोग्यदायी जीवनासाठी अध्यात्मिक गुरू श्रीश्री रवीशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आहे. ज्यामध्ये ध्यान, योग, प्राणायम व सुदर्शन क्रिया आदींचा समावेश आहे. या अभ्यासामुळे व नियमित सराव केल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. कोरोना महामारीच्या या कठीण काळात लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहावे, यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग (बंगलोर) या संस्थेद्वारे विशेष ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घरीच राहून आपण यामध्ये सहभाग घेऊ शकता. विविध प्रशिक्षक यासाठी कार्यरत आहेत. योग व प्राणायाम केल्यामुळे, शरीराची प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते, मन स्थिर होते व नेहमी प्रसन्न राहण्याची कला मनुष्याला मिळते.जगभरातल्या अनेकांना याचा फायदा आजपर्यंत झाला आहे. महापौर वाकळे यांनी देखील स्वतःच्या आरोग्यासाठी हा हॅपीनेस प्रोग्रॅम खूप लाभदायी आहे, असा विश्वास व्यक्त केला. महापौर वाकळे यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगळी अनुभूती मिळविली आहे, असे आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख