श्रीरामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्व घटकांचा समावेश करुन केला. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार या नेत्यांचे नगर जिल्ह्याकडे विशेष लक्ष असते, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
येथील स्व. रामराव आदिक सभागृहात राष्ट्रवादीच्या येथील नवनिवाचित सदस्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कपील पवार, गजेद्र भांडवलकर, शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, महिलाध्यक्षा अर्चना पानसरे, मल्लु शिंदे उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी नुकतीच पक्षामध्ये फेरबद्दल केले असून, सोहेल शेख (दारुवाला) यांची अल्पसंख्याक प्रदेश सचिवपदी, तर वडाळा येथील सचिन पवार यांची युवक तालुकाध्यक्षपदी, हर्षल दांगट यांची विद्यार्थी तालुकाध्यक्षपदी निवड केली. निवडीबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार जगताप म्हणाले, की निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करुन पक्षाला बळकटी द्यावी. स्व. खासदार गोविंदराव आदिक यांनीही पक्ष वाढीसाठी मोलाचे कार्य केले आहे. पक्षाने अविनाश अदिक यांना मोठी जबाबदारी दिली आहे. प्रदेश सरचिटणीस पदासह पक्षाचे प्रवक्ते म्हणुन ते कार्यरत आहे. तसेच नांदेड जिल्ह्याचे प्रभारीपद त्यांच्याकडे सोपविले आहेत, असे त्यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

