आमदार लंके यांना अश्रू अनावर, राठोड यांना वाहिली श्रद्धांजली - Tears were shed for MLA Lanka and tributes were paid to Rathore | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

आमदार लंके यांना अश्रू अनावर, राठोड यांना वाहिली श्रद्धांजली

मुरलीधर कराळे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मी राष्ट्रवादीकडून उभा होतो, तरीही मला भैय्यांचे आशिर्वाद होते. मला आमदार होण्यात भैय्यांचे आशिर्वाद महत्त्वाचे होते.

नगर : ``आपले सर्वांचे दैवत अनिल भैय्या राठोड यांच्या निधनाने धक्का बसला आहे. भैय्या ही आगळी-वेगळी शक्ती होती. बरेच कुटुंब उभे करण्याचे काम त्यांनी केले. मी राष्ट्रवादीकडून उभा होतो, तरीही मला भैय्यांचे आशिर्वाद होते. मला आमदार होण्यात भैय्यांचे आशिर्वाद महत्त्वाचे होते,`` अशा शब्दांत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचे आज ह्यदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना आमदार निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले. बोलताना ते रडू लागल्याने कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले.

आमदार लंके पूर्वी शिवसेनेत होते. त्या वेळी राठोड यांचे ते कायम मार्गदर्शन घेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेल्यानंतरही त्यांनी शिवसेनेवर कोणतेही आरोप न करता विकासात्मक धोरण अवलंबविले. आपण केवळ स्थानिक नेत्यावर नाराज आहोत, वरिष्ठ नेते किंवा शिवसेनेचे इतर नेते आपले मित्रच आहेत, असे ते म्हणत. त्याचा अनुभव आज आला. राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार होताना नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आमदार लंके यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्याचा आग्रह झाला, तेव्हा त्यांना बोलता येईना. डोळ्यातून अश्रू आल्याने ते काही काळ स्तब्ध झाले. स्वतःला सावरून नंतर बोलू लागले. 

भैय्या आमचे मार्गदर्शक होते. ते आपल्या सर्वांचे दैवत होते. भैय्यांचे आशिर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली, तरीही भैय्यांचे आशिर्वाद माझ्यासोबत कायम होते, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख