यांला काय म्हणावं? रुग्णालयातील कोरोनाबाधित चाैकातील चहाच्या टपरीवर - On the tap of the wheel to drink coronated tea at Pathardi Sub-District Hospital | Politics Marathi News - Sarkarnama

यांला काय म्हणावं? रुग्णालयातील कोरोनाबाधित चाैकातील चहाच्या टपरीवर

राजेंद्र सावंत
मंगळवार, 6 एप्रिल 2021

उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरचा कारभार रामभरोसे सुरु आहे. येथील कोरोनाबाधीत रुग्ण हे शहरात फिरुन येतात. काहीजण जेवनासाठी बाहेर जातात.

पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले एक कोरोनाबाधीत ज्येष्ठ नागरीक शहरातील अंजठा चौकातील एका चहाच्या हाॅटेलमधे चहा पिण्यासाठी आले होते. येथे जमलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यानंतर मला कोरोना झालेल्या असल्याचे ज्येष्ठ नागरीकांने सांगितले.

सोशलमिडीयावर संबंधित चित्रफीत व्हायरल झाल्यावर प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसिलदार शाम वाडकर व पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांना संबधीत प्रकाराची चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरचा कारभार रामभरोसे सुरु आहे. येथील कोरोनाबाधीत रुग्ण हे शहरात फिरुन येतात. काहीजण जेवनासाठी बाहेर जातात. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनातील अधिकारी मात्र आवाक झाले.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. शहरातील व्यापाऱ्यांना लाॅकडाऊनबाबत सुचना नसताना अचानक बंद केल्याने अनेकांची अडचण झाली. कोणते व्यवसाय बंद करायचे व कोणते व्यवसाय चालू ठेवायचे याचीही सविस्तर माहीती नसल्याने गोंधळाचे वातावरण होते.

शहरातील व्यापाऱ्यांनी तहसिलदार शाम वाडकर यांना भेटुन लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्याची मागणी केली. या वेळी संतोष जिरेसाळ, राजेंद्र शेवाळे, राजु गुगळे, अविनाश पालवे, बाळासाहेब जिरेसाळ, दिलीप गटागट, पांडुरंग शिळवणे यांच्यासह व्यापारी उपस्थीत होते.

सरकारच्या आदेशाचे पालन करा

व्यापारी व जनतेच्या भावना समजल्या, मात्र सरकारचे आदेश पाळणे महत्वाचे आहे. सरकारही कोरोनाचा प्रसार वाढु नये यासाठीच हे करीत आहे. कोणाला त्रास देण्याची भावना नाही. जनतेने सहकार्य करावे. कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन तहसीलदार शाम वाडकर यांनी केले.

पोलिस संरक्षणाची मागणी

उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरच्या सुरक्षितेतसाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी पोलिस निरीक्षक यांच्याकडे चार दिवसांपूर्वी केली आहे. कोवीड सेंटरमधून रुग्ण बाहेर गेल्याबाबत चौकशी करु. संबंधीतांना सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य सेवा पुरविताना काही उणीवा राहत असतील, तर त्यामधे सुधारणा केली जाईल, असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. अशोक कारळे यांनी व्यक्त केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख