जिल्हा बॅंकेबाबत नंतर बोलू ! खासदार डाॅ. विखे नंतर काय गाैप्यस्फोट करणार - Talk about District Bank later! MP Dr. What will happen after Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेबाबत नंतर बोलू ! खासदार डाॅ. विखे नंतर काय गाैप्यस्फोट करणार

मुरलीधर कराळे
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला, गरिबांसाठी महत्त्वाचा आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा हा अर्थसंकल्प आहे.

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेबाबत निवडणुकीनंतर बोलू, असे सांगून आज खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी बोलणे टाळले. जिल्हा बॅंकेत बिनवरोधवरून झालेल्या राजकारणाबाबतही त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे निवडणुकीनंतर ते काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 17 जागा बिनविरोध झाल्या. इतर चार जागांसाठी मतदान होणार आहे. बिनविरोधचे राजकारण राज्यभर गाजले. डाॅ. विखे पाटील यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात भाजप स्वतंत्र पॅनल करेल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र भाजापला बिनविरोधमध्ये कमी जागा मिळाल्या. याबाबत खासदार विखे पाटील यांनी बोलण्याचे टाळले.

केंद्रीय अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला, गरिबांसाठी महत्त्वाचा आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील केले.

हेही वाचा.. जिल्हा बॅंकेला पुन्हा 27 लाखांना गंडा 

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, "कोरोनामुळे अस्थिर झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले होते. देशाच्या संरक्षण व्यवस्थेसह सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले पाऊल समाजातील सर्व घटकांना आधार देणारे आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शौचालये, गॅस, वीज, शुद्ध पाणी, बॅंकखाते, अनुदानाची रक्कम थेट बॅंकेत जमा करणे आदी तरतुदींमुळे पारदर्शकता येऊन, योग्य व्यक्‍तींना लाभ मिळणार आहे. स्थलांतरित मजुरांसाठी "एक देश- एक शिधापत्रिका' योजना फायद्याची आहे. एका पोर्टलच्या माध्यमातून मजुरांना 32 राज्यांत धान्य देण्याची व्यवस्था केली आहे.''

हेही वाचा... बापानेच केला चिमुरडीवर अत्याचार 

रस्तेबांधणीसाठी एक लाख 18 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे रस्त्यांचे जाळे विस्तारणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेसाठी 2023पर्यंत 100 टक्के विद्युतीकरण करण्याकरिता सरकार वेगाने काम करीत आहे. आरोग्य विभागासाठी गतवर्षाच्या तुलनेत 137 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. कोरोना लसीसाठी 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. पीकखर्चाच्या किमान दीडपट हमीभाव, तसेच कृषी कर्जाबाबत सुलभता आणली असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले. महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख