दिल्लीतील बैठकिचा वृत्तांत घेऊन गिरीश महाजन राळेगणसिद्धीत हजारेंच्या भेटीला - Taking the news of the meeting in Delhi, Girish Mahajan visited thousands in Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीतील बैठकिचा वृत्तांत घेऊन गिरीश महाजन राळेगणसिद्धीत हजारेंच्या भेटीला

एकनाथ भालेकर
गुरुवार, 28 जानेवारी 2021

स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काल केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्या बैठकीचा वृतांत घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन आज सकाळी येथे दाखल झाले.

महाजन यांनी दिल्लीतील बैठकीतील निर्णयांची हजारे यांना माहिती दिली.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीड पट हमीभाव मिळावा, दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी, या हजारे यांच्या मागण्यांसाठी ता. ३० जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

हजारे यांच्याशी माजी मंत्री महाजन यांनी सुमारे एक तास चर्चा केली. त्यांनतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह अन्य मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय काल दिल्लीत कृषिमंत्री नरेंद्र तोमर व विरोधी पक्षनेते नेते फडणवीस, संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या बैठकित झाला आहे. त्याचे प्रारूप आज ठरविण्यात येणार आहे. अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील  याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. 

फडणवीस उद्या राळेगणला येणार

उद्या (२९ ) केंद्रीय कृषी राज्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन राळेगण सिद्धी येथे येण्याची हजारे यांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे लेखी पत्र घेऊन येणार आहेत. ८३ वर्षांचे वय पाहता अण्णांनी उपोषण करू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची इचछा असल्याचे माजी मंत्री महाजन पत्रकारांशी बोलताना सांगितले...

दिल्लीतील हिंसक प्रकार निंदनीय

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसक प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या आंदोलनात असे अनुचित प्रकार होणे निषेधार्थ आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजान यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख