सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सरकारला भिती कशाची : विखे पाटील - Sushant Singh suicide case: What is the government afraid of: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सरकारला भिती कशाची : विखे पाटील

मुरलीधर कराळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

डाॅ. विखे पाटील फाउंडेशनमध्ये सुरू करण्यात आलेल्या श्रीमती सिंधूताई विखे पाटील कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज झाला.

नगर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी गुप्तचर विभागाकडे तपास देण्यासाठी राज्य सरकार का संमती देत नव्हते, जर काही लपवायचे नाही, तर हे प्रकरण त्याच वेळी का वर्ग नाही केले. सरकारची पाटी जर कोरी होती, तर भीती कशाची बाळगतात, असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला.

मातुश्री स्व. सिंधूताई विखे पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून डाॅ. विखे पाटील फाउंडेशनमध्ये सुरू करण्यात आलेल्या श्रीमती सिंधूताई विखे पाटील कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज झाला. या वेळी डाॅ. विखे पाटील फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, महापाैर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी सुशांत सिंह प्रकरणी आपले मत व्यक्त केले.

आमदार विखे पाटील म्हणाले, की मुंबई पोलिसांवर भाजपने कधीच अक्षेप घेतला नाही. परंतु पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात, याला अक्षेप होता. या प्रकरणात काही राजकीय, चित्रपट क्षेत्रातील मंडळी दोषी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकरण गुप्तचर विभागाकडे तपासासाठी देणे आवश्यक होते. आता बिहार सरकारने केंद्र सरकारला शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणी गुप्तचर विभागाकडे चाैकशीला देण्याची परवानगी मिळविली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले, की सुशांत सिंह राजपूर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी एकदाही माध्यमांसमोर आली नाही. त्यामुळे संबंधित आरोपी देश सोडून गेली की काय, अशी शंका वाटते, असे ते म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख