यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गाैरी प्रशांत गडाख यांचे संशयास्पद निधन - Sushant Gary Prashant Gadakh of Yashwantrao Gadakh dies suspiciously | Politics Marathi News - Sarkarnama

यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गाैरी प्रशांत गडाख यांचे संशयास्पद निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (वय ३५) यांचे आज सायंकाळी येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली.

नगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (वय ३५) यांचे आज सायंकाळी येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गौरी गडाख यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तथापि, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी रुग्णालयात व गडाख यांच्या निवासस्थानी भेट देऊन तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद झाली नव्हती. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख