साकळाई योजनेसाठी सर्वेक्षण होणार, आमदार लंके यांचे प्रयत्न फळाला

जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्‍नांसदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांचीपुणे येथे बैठक घेतली.
saaklai.png
saaklai.png

पारनेर : राळेगणसिद्धी तसेच साकळाई योजनांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असून, दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आज पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आले. याबाबत आमदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता.

जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्‍नांसदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक घेतली. या बैठकीत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धीसह नऊ गावे तसेच नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी आमदार लंके यांनी केली. त्यावर या योजनांसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता ही कोकणामध्ये वाहून जाणारे अतितिरिक्त पाणी पुर्वेकडे वळविल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्यापासून होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. मंत्री पाटील यांनी पश्‍चिमवाहिनी नदयांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. या सर्वेक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून साकळाई उपसा योजना तसेच राळेगणसिद्धीसह नऊ गावांच्या योजनांना प्राधान्याने देण्याबाबत पाटील यांनी सहमती दर्शविली.

याच  बैठकीत आमदार लंके यांनी पिंपळगाव जोगे डावा कालव्याच्या 58 ते 70 किलोमिटरपर्यंत अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यावर अस्तरीकरणाचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. पिंपळगाव जोगे कालव्यावरील पारनेर तालुक्यातील वितरिकांची उर्वरीत कामे तातडीने हाती घेण्याच्या आमदार लंके यांच्या मागणीवर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

पिंपळगांव जोगा डावा कालव्याच्या शेवटी असलेल्या वडझिरे तलावापासून शिवडोह तलावापर्यंतच्या बंदिस्त नलिका लाईनचे काम पूर्ण करून पिंपळगाव जोगे धरणातील पाणी शिवडोह तलावापर्यंत पोहचविण्याचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात या बैठकीत पाटील यांनी सूचना दिल्या. कुकडी डावा कालव्या वरील किलोमीटर 31 एस्केप बांधून जांबूतसह इतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश या बैठकीत पाटील यांनी दिले.

दरम्यान, या बैठकीसंदर्भात  बोलताना आमदार लंके यांनी सांगितले, की आपण विधानसभेचे सदस्य झाल्यापासून या दोन्ही योजनांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत होतो. दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांचा मोठा लाभ होणार असल्याची बाब आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पवार यांनीही या दोन्ही योजना कार्यान्वीत झाल्या पाहिजेत, यावर सहमती दर्शविली होती. पवार यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण दोन्ही योजनांसाठी पाठपुरवा केला व मंत्री जयंत पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दििल्या असल्याचे त्यांनी सांगतले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com