सुजीत झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Sujit Jhaware granted pre-arrest bail | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

सुजीत झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मार्तंड बुचुडे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

झावरे यांना नगरच्या न्यालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे तुर्तास तरी त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

पारनेर : पारनरेच्या तहसीलदार ज्याती देवरे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या सरकारी कामात अडथळा, विनयभंग, अश्लील भाषेत फोनवरून संभाषण, खंडणी मागणे व जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याच्या गुन्ह्यात झावरे यांना आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

मागील आठवड्यात झावरे आपल्या शेतकरी व कार्यकर्त्यांसह कांदा निर्यातीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. त्या वेळी झावरे व तहसीलदार देवरे यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर देवरे यांनी झावरे यांच्या विरोधात आरोप करत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच रात्री झावरे यांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पोलिसांच्या निगराणीखाली उपचारही सुरू होते. आज त्यांना नगरच्या न्यालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे तुर्तास तरी झावरे यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

झावरे निवेदन देण्यासाठी गेले असता देवरे यांनी आमची अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. जमावबंदी आदेशाचा विचार करून आपण पाच लोक येऊन निवेदन द्या, असे सांगितले, मात्र  झावरे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने देवरे व झावरे यांच्यात  वाद झाला होता. त्या वेळी झावरे व देवरे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. त्याच वेळी हे प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र देवरे यांनी कोणाचेच ऐकले नाही व त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख