ऊसतोड कामगारांच्या तोंडात `साखर` ! मुश्रीफ यांनी दिले हे आश्वासन - Sugar in the mouths of sugarcane workers! This assurance was given by Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

ऊसतोड कामगारांच्या तोंडात `साखर` ! मुश्रीफ यांनी दिले हे आश्वासन

राजेंद्र सावंत
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

ऊसतोड कामगारांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी राज्यपातळीवर मागणी होत आहे. पाथर्डी येथे काही ऊसतोड कामगारांनी त्यांच्या समस्या मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या.

पाथर्डी : ""पाथर्डी-शेवगाव या तालुक्यांत ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. ऊसतोडणी कामगारांना तोडणीचा दर 27 टक्‍क्‍यांनी वाढवून देण्याचा आग्रह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल,'' अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

माळेवाडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, महसूल विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिवशकंर राजळे, बाळासाहेब ताठे आदी उपस्थित होते.

आगसखांड, शेकटे, भालगाव येथील पिकांचीही मुश्रीफ यांनी पाहणी केली. मुंगूसवाडे येथे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकीच्या घरी भेट देऊन नारायण हिंगे यांचे सांत्वन केले. सरकारी मदतीसाठी प्रयत्न करतो, असे आश्‍वासन दिले.

ऊसतोड कामगारांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी राज्यपातळीवर मागणी होत आहे. पाथर्डी येथे काही ऊसतोड कामगारांनी त्यांच्या समस्या मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या. त्यांचे समाधान करताना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडविणार नाही. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सरकारला माहिती आहेत. या भागात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांना अनुदान देण्याबरोबरच ऊसतोड कामगारांचे प्रश्नही जास्तीत जास्त लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख