मंत्री थोरात यांच्या कारखान्याची अशीही आघाडी ! कामगारांना केले खूष - Such a lead of Minister Thorat's factory! Congratulations to the workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मंत्री थोरात यांच्या कारखान्याची अशीही आघाडी ! कामगारांना केले खूष

आनंद गायकवाड
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनस यामधून 5 कोटी 38 लाख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान मधून 2 कोटी 68 लाख रुपये आणि शेतकर्‍यांच्या ठेवीचे 1 कोटी 48 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्थिक मंदी व कोरोनाच्या संकटातही शेतकरी, सभासद व कामगारांना मदतीची आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत यावर्षी दिवाळी काळात कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु असून, कारखान्याने कायम शेतकरी, कष्टकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यावर्षी कोरोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला आहे. तसेच दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनस यामधून 5 कोटी 38 लाख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान मधून 2 कोटी 68 लाख रुपये आणि शेतकर्‍यांच्या ठेवीचे 1 कोटी 48 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कारखान्याच्या सर्व सभासदांना 15 किलो मोफत साखर ही देण्यात येणार आहे.

शेतकरी व कामगारांचे हित जोपासणार्‍या या कारखान्यांने या वर्षीही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजितभाऊ थोरात व सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर यांनाी ही परंपरा कायम ठेवली असून, हे काम राज्यातील सर्व कारखान्यासाठी आदर्शवत ठरणारे आहे. 20 टक्के बोनस व 30 दिवसांचा अनुग्रह मिळणार असल्याने अनुदान सर्व कर्मचारी, शेतकरी व सभासद आणि संगमनेरमधील व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख