नगर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने नवीन रस्ते करण्यासाठी एक कोटी 75 लाख, तर रस्ते पॅचिंगसाठीही एक कोटी 75 लाख रुपयांची तरतूद केली आहे. पथदिवे बसविण्यासाठीची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही पथदिव्यांच्या वीजबिलासाठी 6 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे महापालिकेने रस्तेदुरुस्तीपेक्षा रात्री रस्त्यांवरील खड्डे दिसण्यासाठी खर्च करण्याचा घाट घातला आहे.
महापालिकेचे 685 कोटी 89 लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर करताच, प्रकाश भागानगरे यांनी अभ्यासासाठी एक दिवसाचा कालावधी देण्याची सूचना मांडली. तिला मुदस्सर शेख यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार उद्या (शुक्रवारी) अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे.
हेही वाचा... अर्सेनिक अल्बम संशयाच्या फेऱ्यात
तसेच मोकाट कुत्री, जनावरे पकडण्यात येत नसतानाही, 1 कोटी 10 लाख, तसेच कोंडवाड्याला 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दहा दिवस केला अभ्यास
"महापालिकेचे 2021-22 वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सुमारे दहा दिवस अभ्यास केला. मागील दोन ते तीन वर्षांतील आकडेवारीनुसार अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेत जमा व खर्चात मोठी तफावत आहे. त्यामुळे भांडवली खर्च हे शासकीय निधीतून भागवावे लागत आहेत. शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून महापालिकेला उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे,'' असे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समितीसमोर महापालिकेचे 2021-22चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्याप्रसंगी गोरे यांनी माहिती दिली.
हेही वाचा... थांबा त्यांची गंमतच काढतो
या वेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, सुप्रिया जाधव, समद खान, रवींद्र बारस्कर, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव शहाजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित होते.
अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य
उत्पन्न
* महसुली उत्पन्न - 305 कोटी 95 लाख
* महसुली खर्च (संकलित कर, जीएसटी अनुदान आदी) - 255 कोटी 24 लाख
* भांडवली जमा - 332 कोटी 63 लाख
* भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व महापालिका हिस्सा धरून जमा - 385 कोटी 71 लाख
Edited By - Murlidhar Karale

