जामखेड : जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. केवळ औपचारिक घोषणा निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहे.
जामखेड तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतीची निवडणूक तारीख 15 जानेवारी रोजी होणार असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाचा अखेर 417 जागांसाठी 1 हजार 302 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाच यापैकी तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतीची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. सारोळा येथील सदस्य संख्या 9 दाखल अर्ज 9. तर खुर्दपैठण सदस्य संख्या 7 दाखल अर्ज 7, आपटी सदस्य संख्या 7 दाखल अर्ज 7, पोतेवाडी सदस्य संख्या 7 दाखल उमेदवारी अर्कीज 7, याकी सदस्य संख्या 9 दाखल कर्ज 9. अशा पाच ग्रामपंचायती यावेळी बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील गेली तीन पंचवार्षिक निवडणुकीचा अंदाज घेतला असता यावर्षी 49 ग्रामपंचायती निवडणुकीसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज पहिल्यांदा दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या टप्प्यात निवडणुकीला उत्साह वाटत नव्हता, तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या किचकट प्रक्रियेमुळे यावर्षी उमेदवारी अर्ज कमी येतील, असे सर्वांनाच वाटत होते, मात्र तसे न होता शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा झालेला निर्णय उमेदवारांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरला.
एक 302 मतदारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती, तोपर्यंत इच्छुक उमेदवारांची गर्दी तहसील परिसरामध्ये कायम राहिली.
दरम्यान, मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास त्यांना 30 लाखांचे बक्षिस आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे या पाच ग्रामपंचायतींना हे बक्षिस मिळू शकणार आहेत. गावातील विकासकामांसाठी हा तीस लाखांचा निधी मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. हा आदर्श महाराष्ट्रात चर्चिला जाणार आहे.
Edited By - Murlidhar karale

