जयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायकल्प, आमदार काळे यांच्या प्रयत्नांना यश

सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय घेतला. उजवा कालवा जेमतेम सव्वाचारशे क्युसेक्सने वहातो त्याची क्षमता ७५० क्युसेक्सपर्यंत वाढवायची आहे.
Aushutosh kale.jpg
Aushutosh kale.jpg

शिर्डी : शंभरी पार केलेल्या व देखभाली अभावी खिळखीळ्या झालेल्या गोदावरी कालव्यांचा कायाकल्प करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला. दोन्ही कालव्यांवरील जिर्ण बांधकामांच्या जागी नवी बांधकामे करण्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना त्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली. पुढील टप्प्यात आणखी ४४ कोटी रूपये खर्चाच्या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. आपल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अशी माहीती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली. (The success of Godavari's rejuvenation and MLA Kale's efforts is due to Jayant Patil)

आमदार काळे म्हणाले, की बारा वर्षांपासून या कामांचे प्रस्ताव प्रलंबित होते. आपण मंत्री जयंत पाटील यांना कालव्यांची घटलेली वहनक्षमता व त्यातून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय घेतला. उजवा कालवा जेमतेम सव्वाचारशे क्युसेक्सने वहातो त्याची क्षमता ७५० क्युसेक्सपर्यंत वाढवायची आहे. डावा कालवा जेमतेम तिनशे क्युसेक्सने वहातो त्याची क्षमता सव्वा चारशे क्युसेक्सपर्यंत वाढवायची आहे. त्यासाठी कालव्यांवरील जिर्ण बांधकामे पाडून त्याजागी नवी बांधकामे करणे गरजेचे होते. आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधीची तरतूद करण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्प्यात उजव्या कालव्यावर २२ तर डाव्या कालव्यांवर १० बांधकामे करावी लागतील. त्यात मोऱ्यांची संख्या अधिक आहे. आता तेथे काॅक्रिटयुक्त मो-यांची कामे करायची आहेत. दोन आवर्तनाच्या मधला काळ साधून हि कामे करावी लागतील. त्यामुळे थोडा वेळ लागेल अन्यथा पुढील वर्षभरात पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण व्हायला अडचण नव्हती.

बारा वर्षानंतर न्याय मिळेल

गोदावरी कालव्यांची वहनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल. कमीत कमी दिवसात आवर्तन पूर्ण करून लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहचविणे त्यामुळे शक्य होईल. गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणीप्रश्न आणि समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे निर्माण झालेले लाभक्षेत्रावरील संकट या पार्श्वभुमीवर या निर्णयाला एक वेगळे महत्व आहे. तब्बल बारा वर्षानंतर गोदावरी कालव्यांना न्याय मिळाला आहे, असे आमदार काळे यांनी सांगितले. दरम्यान, हा गोदावरीचा प्रश्न महाराष्ट्रात गाजला आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com