राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता होणार 20 सप्टेंबरला - State service pre-examination postponed, now on September 20 | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता होणार 20 सप्टेंबरला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यसेवा पूूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता देशपातळीवरील राष्ट्रीय परीक्षा व प्रवेश प्रक्रीया एकाच दिवशी येत असल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबरला होणार आहे. 

नगर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यसेवा पूूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता देशपातळीवरील राष्ट्रीय परीक्षा व प्रवेश प्रक्रीया एकाच दिवशी येत असल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबरला होणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर 2019 रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार राज्यासेवीची पूर्व परीक्षा 5 एप्रिल रोजी घेण्याचे नियोजन केले होते. तथापि, या काळात कोरोनाचा प्रादुर्भावर देशभर वाढत होता. त्यामुळे त्यात बदल करून 13 सप्टेंबर 2020 रोजी करण्याचे नियोजन केले होेते. त्याच दिवशी देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश प्रक्रिया असल्याने परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, ती आता ता. 20 सप्टेंबरला होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

कोरोनामुळे ही परीक्षा दोनदा लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला, तरी परीक्षा घेण्यासाठी हाॅल निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर तसेच कोरोनाविषयक सर्व नियमांची अंमलबजावणी करीत या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख